शहरं
Join us  
Trending Stories
1
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
2
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
3
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
4
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
5
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
6
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
7
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
8
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
9
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
10
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
11
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
12
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
13
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
14
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
15
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
16
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
17
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
18
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
19
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
20
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
Daily Top 2Weekly Top 5

Ratnagiri: छेड काढणाऱ्या बसवाहकाला तरुणीसह ग्रामस्थांनी चोपले; दापोली येथील घटना

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 10, 2024 17:23 IST

दापोली : नेहमी छेड काढणाऱ्या बसवाहकाला महाविद्यालयीन तरुणीसह ग्रामस्थांनी चांगलाच चोप दिल्याची घटना बुधवारी सकाळी दापोली तालुक्यातील दाभोळ ते ...

दापोली : नेहमी छेड काढणाऱ्या बसवाहकाला महाविद्यालयीन तरुणीसह ग्रामस्थांनी चांगलाच चोप दिल्याची घटना बुधवारी सकाळी दापोली तालुक्यातील दाभोळ ते कोळथरे मार्गावर घडली. बसवाहक माझी मेहबूब तांबोळी (मूळ गाव शिंदे गल्ली, रेणापूर, जिल्हा लातूर) हे दापोली आगारात कार्यरत असून त्यांच्याविरोधात दाभोळ पोलिस स्थानकात फिर्याद देण्यात आली आहे.दापोली बसस्थानकातील बस पंचनदी येथे जाते. काही महाविद्यालयीन तरुणी त्यातून नेहमी प्रवास करतात. एक तरुणी आघाडी फाटा येथे उतरते. त्यावेळी वाहकाने तिची छेड काढल्याचा प्रकार दोनतीन वेळा घडला आहे. बुधवारी सकाळीही पुन्हा तसाच प्रकार या वाहकाकडून घडल्याने या मुलीने महाविद्यालयाच्या शिपायाला फोन करून सांगितले. त्यामुळे महाविद्यालयातील शिक्षक, विद्यार्थी, पालक सगळे संतप्त झाले. गावातून पुढे गेलेली बस परत येण्याची वाट पाहत सर्वजण रस्त्यावरच थांबले. ज्यावेळी बस परत आली तेव्हा सर्वांनी बस थांबवून वाहकाला बाहेर खेचले आणि त्याची धुलाई केली. त्या महाविद्यालयीन तरुणीनेही त्याला चपलेनेच प्रसाद दिला.

चार-पाच तरुणींनी पुढे येऊन प्रसाद दिल्यावर वाहकाने घडलेला प्रकार कबूल केला. मात्र तोपर्यंत त्याला ग्रामस्थांनी चांगलेच धुतले. दरम्यान, हा प्रकार कळल्यानंतर दाभोळ सागरी स्थानकाचे पोलिस घटनास्थळी पोहोचले आणि त्यांनी त्या वाहकाला ताब्यात घेतले आहे. एसटी महामंडळाचे अधिकारी घटनास्थळी पोहोचले होते. संतप्त ग्रामस्थांनी या वाहकावर कडक कारवाई करण्याची मागणी केली आहे.

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस