शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

Ratnagiri: वर्ग सुटला अन् शाळेचे छप्पर कोसळले, सुदैवाने २८ विद्यार्थी वाचले; शिरवली येथील घटना

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 26, 2024 14:35 IST

दुर्घटनेनंतर पालकांनी खेडच्या गटविकास अधिकाऱ्यांना निवेदन दिले

खेड (जि. रत्नागिरी) : गेले दोन दिवस काेसळणाऱ्या संततधार पावसामुळे शिरवली (ता. खेड) येथील प्राथमिक शाळेच्या एका वर्गखोलीचे काैलारू छप्पर सोमवारी सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास कोसळले. सुदैवाने शाळा सुटल्यानंतर ही दुर्घटना घडल्याने शाळेतील २८ विद्यार्थी वाचले आहेत. अन्यथा माेठी दुर्घटना घडली असती.शिरवली येथील जिल्हा परिषद पूर्व प्राथमिक शाळा १९५४ मध्ये बांधण्यात आली आहे. या शाळेत पहिली ते सातवीचे वर्ग असून, २८ पटसंख्या आहे. या शाळेला सत्तर वर्षे होऊनही शाळेच्या दुरुस्तीसाठी कोणत्याही प्रकारचा निधी खर्च पडलेला नसल्याचे ग्रामस्थांनी सांगितले. शाळेच्या दुरुस्तीबाबत ग्रामस्थांनी वारंवार पत्रव्यवहार करूनही शाळेच्या दुरुस्तीकडे लक्ष दिलेले नाही. त्यामुळे नादुरुस्त शाळेच्या वर्गखाेलीचे छप्पर सोमवारी मुसळधार पावसात काेसळले. सुदैवाने वर्गात विद्यार्थी नसल्याने काेणालाही दुखापत झालेली नाही.

या दुर्घटनेनंतर शाळेतील विद्यार्थ्यांच्या पालकांनी मंगळवारी खेडच्या गटविकास अधिकाऱ्यांना निवेदन दिले आहे. शाळेच्या इमारतीचे उर्वरित छतही मुसळधार पावसात केव्हाही पडू शकते, तसेच विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेचा विचार करता जोपर्यंत विद्यार्थ्यांना सुरक्षित पर्याय व्यवस्था होत नाही, तोपर्यंत विद्यार्थ्यांना त्या शाळेत पाठवले जाणार नाही, असे निवेदनात म्हटले आहे.

गेल्या दोन वर्षांपासून ही शाळा मोडकळीच आल्याबाबतचे पत्र ग्रामस्थांकडून गटशिक्षणाधिकारी यांना दिले जात आहे. मात्र, दुरुस्तीच्या कामासाठीही शासनाकडून निधी न आल्यामुळे दुरुस्ती झालेली नाही. त्यामुळेच ही दुर्घटना घडली आहे. योग्यवेळी दुरुस्ती देखभाल झाली असती तर आज हे छप्पर काेसळले नसते. - वसंत गुरव, माजी सरपंच, शिरवली.

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीRainपाऊसSchoolशाळा