शहरं
Join us  
Trending Stories
1
डिजिटल अरेस्ट करणाऱ्या गँगवर मोठी कारवाई, कंबोडियामध्ये १०५ भारतीयांसह ३०७५ अटकेत
2
'देशाच्या राजकारणातील आशादायी नेतृत्व...'; संजय राऊत यांची नितीन गडकरींसाठी खास पोस्ट
3
उड्डाण करत असतानाच विमानाच्या इंजिनाला आग, पायलटने दिला मेडे कॉल, अहमदाबादमध्ये मोठा अपघात टळला  
4
छेड काढणाऱ्या संभाजी ब्रिगेडच्या माजी प्रदेशाध्यक्षांना महिलेने चपलेने मारले 
5
IND vs ENG 4th Test Day 1 Stumps : साईच्या 'फिफ्टी'सह मोठा तिढा सुटला, पण...
6
कॉलेजमध्ये मराठीत बोलल्याने विद्यार्थ्याला हॉकी स्टिकने मारहाण, जिवे मारण्याची धमकी देऊन आरोपी फरार
7
बापरे! टीम इंडियाला मोठा धक्का; उलटा फटका मारताना पंतला दुखापत; लंगडत लंगडत सोडलं मैदान (VIDEO)
8
धुळ्यात भरचौकात गोळीबार करत मुंबईतील ज्वेलर्सच्याय कर्मचाऱ्यांकडून लाखोंचे सोने लुटले
9
"महायुती सरकारने महाराष्ट्राचा बनवला तमाशा, विधानसभेत क्लब तर बाहेर WWF चा आखाडा’’, काँग्रेसची बोचरी टीका  
10
वाखारीत न्यू अंबिका कला केंद्रात गोळीबार;आमदाराच्या भावासह चौघांवर गुन्हा दाखल
11
IND vs ENG: चेंडू खेळला नाही म्हणून पंचांनी गिलला दिलं OUT; स्टोक्सच्या गोलंदाजीवर काय घडलं? (VIDEO)
12
बहीण मित्रासोबत गेली लॉजवर, पाठलाग करत पोहचला भाऊ, रंगेहात पकडलं आणि...
13
IND vs ENG : यशस्वीची फिफ्टी ठरली खास; कारण ओल्ड ट्रॅफर्डच्या मैदानात ५० वर्षांनी असं घडलं
14
Nala Sopara: नालासोपाऱ्यात १२व्या मजल्यावरून पडून तीन वर्षांच्या चिमुकलीचा मृत्यू!
15
मुंबईकरांसाठी खुशखबर! शहराला पाणीपुरवठा करणारा तानसा तलाव ओसंडून वाहू लागला!
16
३२ लाखांची FD, संपत्तीची हाव... दत्तक मुलाचं आईसोबत भयंकर कृत्य, आता मिळाली शिक्षा
17
VIDEO: कॉलर पकडली, डोक्यावर फाईट मारली.. भिवंडीत टेम्पोचालक व पोलिसांमध्ये तुंबळ हाणामारी
18
चार किलो सोनं चोरलं, जुगारात २५ लाख जिंकले, पण सेकंड हॅड मोबाईलच्या नादात अडकला चोर  
19
...अन् यशस्वी जैस्वालची बॅट दांड्यातून निखळली; किती वेगाने आला होता चेंडू? जाणून घ्या बॅटची किंमत
20
गुजरात ATS ची मोठी कारवाई; अल-कायदाशी संबंधित चार दहशतवाद्यांना अटक

पक्षात राहून विरोधात काम करणाराच खरा शत्रू, कार्यकर्ता मेळाव्यात आमदार भास्कर जाधव यांचा हल्लाबोल 

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 7, 2025 15:59 IST

शिवसेनेतील लोकांनी तरी प्रभाकर शिंदे यांना जरी मतदान केले असते, तरी पक्षाचे डिपॉझीट वाचले असते

चिपळूण : चिपळूण मतदारसंघात ज्यावेळी राष्ट्रवादीचे पहिले आमदार निवडून आले, तेव्हा माझ्याविरोधात कोणी काम केले, हे समोर आहे. शिवसेनेतील लोकांनी तरी प्रभाकर शिंदे यांना जरी मतदान केले असते, तरी पक्षाचे डिपॉझीट वाचले असते. विरोधकांपेक्षा पक्षात राहून पक्षाच्या विरोधात काम करणारा हाच शत्रू असतो आणि तेच धोकादायक ठरत आहे, असे रोखठोक विधान उद्धवसेनेचे नेते आमदार भास्कर जाधव यांनी केले.शहरातील बांदल सभागृहात उद्धवसेना कार्यकर्त्यांचा मेळावा झाला. यात अपेक्षेप्रमाणे आमदार भास्कर जाधव यांनी जोरदार हल्लाबोल केला. ते म्हणाले की, २०२४ च्या विधानसभा निवडणुकीत संगमेश्वर तालुक्यातील कार्यकर्त्याना उमेदवारी नको होती, पक्षाचा आमदार हवा होता. मात्र, चिपळूणमध्ये आपल्याविरोधात बैठका सुरू होत्या. आता कित्येक वर्षे वाट पाहावी लागणार आहे.मेळाव्यात उपनेते बाळ माने, सहदेव बेटकर, जिल्हाप्रमुख बाळाराम खेडेकर, दत्ता कदम, जिल्हा संघटक संतोष थेराडे, महिला आघाडी जिल्हाध्यक्षा अरुणा आंबे, विभाग प्रमुख सचिन शेट्ये, बाळा कदम, तालुकाप्रमुख पप्या चव्हाण, युवासेनेचे विक्रांत जाधव, भय्या कदम उपस्थित होते.

चिपळूणची जागा घालवली कोणी?

  • उद्धवसेनेला चिपळूणची जागा परत मिळावी अशी मागणी आता केली जात आहे; पण आधीच्या निवडणुकीत उद्धवसेनेला मिळत असलेली जागा घालवली कोणी, असा प्रश्न आमदार जाधव यांनी केला.
  • संतोष थेराडे, प्रताप शिंदे, बाळा कदम, विनोद झगडे, तुम्ही स्वतःलाच प्रश्न विचारा. चिपळूणची जागा कोणामुळे गेली, तुम्ही ही जागा घालवलीत, असा थेट हल्लाही त्यांनी यावेळी केला.
  • शरद पवार यांनी ही जागा उद्धवसेनेला दिली होती. मीच त्यांच्याशी चर्चा केली होती. त्यानुसार बैठक लावून मी प्रयत्नही सुरू केले होते. मात्र, मला जागा मिळू नये म्हणून विरोध सुरू झाला, बैठका सुरू झाल्या. काहींनी तर दुकानेच थाटली. शेवटी घडायचे तेच घडले. आता कित्येक वर्षे येथे उद्धवसेनेचा आमदार होण्याची वाट बघत बसा, अशी खदखद त्यांनी व्यक्त केली.

कार्यकर्त्यांचे कान टोचलेआज पक्षाची स्थिती वाईट आहे. कोणी निघून गेला की काहीच फरक पडत नाही, हे वारंवार सांगितले जाते. मात्र, परिस्थिती तशी नाही. जाणारा कार्यकर्ता आपणच मोठा केलेला असतो. त्याचे कर्तृत्व पाहूनच त्याला पद दिलेले असते. त्यामुळे नेहमी फरक पडत नाही, असे म्हणण्यापेक्षा कोणी गेले तरी फरक पडू देणार नाही, असा निर्धार करून पुढे जाऊया आणि जुन्यांना घेऊन पूर्वीचे वैभव प्राप्त करूया, अशा शब्दांत आमदार जाधव यांनी कान टोचले.

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीShiv SenaशिवसेनाUddhav Thackerayउद्धव ठाकरेBhaskar Jadhavभास्कर जाधवChiplunचिपळुण