शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

‘रत्नागिरी हापूस’चे दर सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर 

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 22, 2025 17:49 IST

यावर्षीच्या एकूण हंगामात आंबा उत्पादन २५ ते ३० टक्केच

रत्नागिरी : स्थानिक बाजारपेठेतरत्नागिरी हापूस’ विक्रीसाठी उपलब्ध झाला आहे. मात्र, आंब्याचे दर अजूनही सर्वसामान्यांच्या खिशाला न परवडणारे असल्याने सर्वसामान्यांसाठी आंबा ‘अगाेड’च आहे. सध्या बाजारात ८०० ते १६०० रुपये डझन दराने आंब्याची विक्री केली जात आहे. हा दर सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर आहे.यावर्षी नैसर्गिक दृष्टचक्रामुळे जेमतेम २५ ते ३० टक्केच आंबा उत्पादन आहे. फेब्रुवारीच्या शेवटच्या आठवड्यापासूनच उष्म्याचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे फळांची माेठ्या प्रमाणात गळ झाली. शिवाय फळे भाजली असून, फळांवर डाग पडले आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांचे दुहेरी नुकसान झाले आहे. वाढत्या उष्म्यामुळे तयार आंबा शेतकरी विक्रीसाठी मुंबई, पुणे बाजारात पाठवत आहेत. मात्र, आंब्याची आवक वाढल्याने दरही घसरले आहेत. त्यामुळे आता स्थानिक बाजारात आंबा विक्रीसाठी येऊ लागला आहे.स्थानिक बाजारपेठेत सध्या हापूस ८०० ते १६०० रुपये डझन आहे. हा दर सर्वसामान्यांना न परवडणारा आहे. शिमगाेत्सवासाठी गावी आलेल्या काही चाकरमान्यांनी किरकाेळ स्वरूपात हापूसची खरेदी केली. मात्र, चढ्या दरामुळे खरेदीचे प्रमाण कमी आहे. सध्या पायरीलाही हापूसचा दर असल्याने आंबा अजूनही ‘अगाेड’च राहिला आहे.

कच्चा-पिका आंबाकच्चा व पिका दोन्ही प्रकारचा आंबा विक्रीसाठी उपलब्ध आहे. पिकलेल्या आंब्याला कच्च्यापेक्षा डझनाला १०० ते २०० रुपये जास्त मोजावे लागत आहेत. सहा डझनपासून चार डझन आकाराची फळे विक्रीसाठी उपलब्ध आहेत. कच्च्यापेक्षा पिकलेल्या आंब्याला वाढती मागणी असून, एक व दोन डझनचे बाॅक्स विक्रीसाठी आले आहेत.

यावर्षीच्या एकूण हंगामात आंबा उत्पादन २५ ते ३० टक्केच आहे. सुरुवातीचा आंबा कमी आहे. एप्रिलमध्ये आवक वाढेल, पुन्हा मे मध्ये आवक कमी होईल. गतवर्षी या हंगामात आंबा उत्पादन जास्त असल्यामुळे दर कमी होते. परंतु, यावर्षी आंबा उत्पादन कमी असल्यामुळे दर टिकून आहेत. - सतीश पवार, विक्रेता, रत्नागिरी

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीMangoआंबाMarketबाजार