शहरं
Join us  
Trending Stories
1
डॉक्टर तरुणी रात्री १.३० वाजता हॉटेलमध्ये आली होती; सीसीटीव्ही फुटेज पहिल्यांदाच समोर आले
2
मोठी बातमी! भारताकडे निघालेला रशियन तेलाचा टँकर समुद्रातून अचानक माघारी वळला; रिफायनरींची चिंता वाढली...
3
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्यासोबत दिसल्या स्क्वॉड्रन लीडर शिवांगी सिंग! 'त्या' एका फोटोने पाकिस्तानचा होईल जळफळाट
4
आजोबांच्या संपत्तीवर नातवंडांचा जन्मसिद्ध हक्क नाही; मुंबई हायकोर्टाचा मोठा निर्णय, प्रकरण काय?
5
Mutual Funds मध्ये गुंतवणूक करणाऱ्यांचा होणार फायदा; सेबीचा नवा प्रस्ताव, गुंतवणूकदारांना काय मिळणार?
6
भारताचा हिटमॅन 'जगात भारी'! वनडेमध्ये रोहित शर्मा अव्वल, गिलला मागे टाकत रचला विश्वविक्रम
7
पाकिस्तान करणार हमासचा खात्मा? अमेरिकेची 'चलाख' खेळी; असीम मुनीर २० हजार सैन्य उतरवणार
8
इथं १ ग्रॅम घेताना घाम फुटतोय! मग ७ महिन्यात ६४००० किलो सोनं भारतात कोणी आणलं?
9
फक्त १० वर्षांच्या फरकाने तुमच्या SIP रिटर्न्समध्ये ४७ लाखांचा मोठा फरक; तोटा होण्याआधी गणित पाहा
10
Viral News: रस्त्यावरून खरेदी केले जुने बूट; ब्रँडचं नाव पाहिलं आणि किंमत तपासली; महिला झाली शॉक!
11
Guru Upasna: गुरु उच्च राशीत असेल तर उपासना कोणती करावी किंवा कशी वाढवावी? वाचा 
12
Shreyas Iyer : श्रेयस लवकर बरा व्हावा! सूर्याच्या आईची देवासमोर प्रार्थना; व्हिडिओ व्हायरल
13
जो तो एआयच्या मागे लागलाय...! इंटेलच्या CEO नी यासाठी राजीनामा दिला; आता ₹९१५ कोटी लावून...
14
भारत-अमेरिका टॅरिफ वॉर थांबणार, US सोबत खास डील होणार? ट्रम्प यांचे मोठे संकेत
15
सरकार पुन्हा विकणार LIC चे शेअर्स! केव्हा आणि कसं? जाणून घ्या संपूर्ण डिटेल्स
16
Indian Currency Facts : भारतीय चलनी नोटांच्या मध्यभागी खरंच चांदीची तार असते का? जाणून घ्या...
17
PPF Vs NPS Investment: पैशांची गुंतवणूक करायची आहे, एनपीएस निवडू की पीपीएफ? नक्की काय करावं
18
शाब्बास पोरा! ना कॉलेज, ना कोचिंग... UPSC सह क्रॅक केल्या १२ सरकारी नोकऱ्या, झाला IPS
19
"बंगल्यात झालेल्या चोरीतून सीडी, पेनड्राईव्ह, कागदपत्रे लांबवली", एकनाथ खडसेंचा मोठा गौप्यस्फोट
20
भाभा अणुसंशोधन केंद्रात हेरगिरीचा डाव, शास्त्रज्ञ बनून फिरत होते आदिल आणि अख्तर, असं फुटलं बिंग 

अणुस्कुरा घाटात चोरट्यांचा पाठलाग, एक जण ताब्यात; दुचाकी चोरुन निघाले होते पळून

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 20, 2024 12:57 IST

घटनेनंतर घाट परिसरात चार ठिकाणी पोलिस पथके तैनात ठेवण्यात आली होती

राजापूर : दुचाकीची चोरी करून अणुस्कुरा घाटमार्गे कोल्हापूरच्या दिशेने पळणाऱ्या तिघांचा पोलिसांनी पाठलाग करून एकाला ताब्यात घेतले आहे. ताे अल्पवयीन असून, अन्य दाेघे पळून जाण्यात यशस्वी झाले. हा प्रकार शनिवारी घडला. या घटनेनंतर घाट परिसरात चार ठिकाणी पोलिस पथके तैनात ठेवण्यात आली होती. रविवारी दिवसभर सुमारे तीस पोलिसांची कुमक येरडव, अणुस्कुरा परिसरात फरार असलेल्या अन्य दोघांचा शोध घेत होती.

दोन दुचाकीवरून तीन अनोळखी तरुण ओणीमध्ये आले होते व तिथे त्यांनी पिस्तूलसारख्या दिसणाऱ्या लाईटरने काहींना धमकवण्याचा प्रयत्न केला. या प्रकाराची माहिती राजापूर पोलिसांसह जिल्हा पोलिस अधीक्षक धनंजय कुलकर्णी यांनाही देण्यात आली. हे तिघे ओणीवरून अणुस्कुरा घाटाच्या दिशेने निघाले होते. मात्र, अणुस्कुरा येथील तपासणी नाक्यावर पोलिस पाहून त्यांनी येरडवच्या दिशेने पलायन केले. वाटेतच दोन्ही दुचाकी टाकून ते आजूबाजूच्या जंगलात जाऊन लपले.दरम्यान, पोलिस अधीक्षक कुलकर्णी यांनी तत्काळ सूत्रे हलविली आणि मोठा पोलिस फौजफाटा घाट परिसरात वाढविला. ते स्वत: घटनास्थळी दाखल झाले होते. स्थानिक ग्रामस्थांच्या मदतीने येरडव परिसरासह अणुस्कुरा घाटाचा परिसर पिंजून काढण्यात आला. त्यानंतर एक अल्पवयीन मुलगा पाेलिसांच्या तावडीत सापडला. मात्र, अन्य दोघे फरार होते. दुचाकीवरून आलेले तिघेही पारनेर (जि. अहमदनगर) मधील असल्याचे तपासात पुढे आले आहे.

शनिवारी रात्रभर येरडवच्या जंगल परिसरात पोलिस फरार झालेल्या दाेघांचा शोध घेत होते. रविवारी सकाळपासून पुन्हा शोधमोहीम सुरू होती. राजापूरचे पोलिस निरीक्षक राजाराम चव्हाण व त्यांची टीम शोध घेत होती. रविवारी सकाळी फरार असलेल्या दाेघांना येरडवच्या जंगल परिसरात काहींनी पाहिले होते. मात्र, नंतर ते फरार झाले.त्या आधी राजापूर पोलिस निरीक्षक राजाराम चव्हाण, पोलिस उपनिरीक्षक सुधीर उबाळे व राजापूर पोलिस स्थानकाच्या कर्मचाऱ्यांनी ज्या दिशेने तरुण पळाले त्या डोंगराळ भागाचा तपास करत होते. 

चाेरीची दुचाकी संगमेश्वरातीलफरार झालेल्या दाेघांची नावे दीपक श्रीमंदीलकर, अजय घेगडे अशी असल्याचे समजले. ते दोन दुचाकी चोरून पुण्याच्या दिशेने चालले होते. दोन्ही गाड्यांवर नंबर प्लेट नव्हती. मात्र, मिळालेल्या माहितीनुसार १६ मे राेजी संगमेश्वर तालुक्यातून एक दुचाकी चोरीला गेली होती. ती गाडी त्या तिघांकडे सापडली.

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीtheftचोरीCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस