Ratnagiri: स्वत:च चिता रचून वृद्धाने केली आत्महत्या

By मनोज मुळ्ये | Updated: November 8, 2023 15:27 IST2023-11-08T15:26:55+5:302023-11-08T15:27:07+5:30

घराशेजारी पेटलेली आग पाहून शेजारीपाजारी धावत आले. मात्र तोपर्यंत खूप उशीर झाला होता.

The old man committed suicide by building a pyre himself | Ratnagiri: स्वत:च चिता रचून वृद्धाने केली आत्महत्या

Ratnagiri: स्वत:च चिता रचून वृद्धाने केली आत्महत्या

लांजा : स्वत:ची चिता रचून एका वृद्धाने आत्महत्या केल्याचा प्रकार लांजा तालुक्यातील पालू येथे मंगळवारी मध्यरात्री २ वाजता घडला आहे. या प्रकारामुळे गावात खळबळ उडाली आहे. शंकर सखाराम सपकाळ (७०) असे त्यांचे नाव असून, मानसिक संतुलन बिघडले असल्याने त्यांनी हा प्रकार केला असल्याचा अंदाज आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार पालू येथील पांदले खालची वाडी येथील शंकर सपकाळ यांचे वयोमानानुसार मानसिक संतुलन बिघडले होते. मंगळवारी मध्यरात्रीनंतर २ वाजता त्यांनी घराच्या शेजारीच असलेलल्या पडवीतील लाकडे तसेच घराचे जुने वासे यांची चिता रचली. ती पेटवून ते त्यावर झोपले. पेटलेल्या लाकडांनी त्यांच्या शरीराचा जळून कोळसा झाला. घराशेजारी पेटलेली आग पाहून शेजारीपाजारी धावत आले. मात्र तोपर्यंत खूप उशीर झाला होता.

पोलीसांनी आकस्मिक मृत्यू म्हणून नोंद केली आहे. ही आत्महत्या आहे की घातपात, यादृष्टीने पोलिस तपास करणार आहेत. पोलिस निरीक्षक दादासाहेब घुटुकडे यांच्यासमवेत पोलिस पथकाने घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला. अधिक तपास हेडकॉन्स्टेबल सचिन भुजबळराव करत आहेत.

Web Title: The old man committed suicide by building a pyre himself