शहरं
Join us  
Trending Stories
1
"मी उद्या भाजपा कार्यालयात येतोय, तुम्हाला...", विभव कुमार यांच्या अटकेनंतर अरविंद केजरीवाल यांचे नरेंद्र मोदींना आव्हान
2
विराट कोहलीचा भीमपराक्रम! जमला नाही कोणालाच असा विक्रम, ख्रिस गेल याच्याशीही बरोबरी
3
मोदींना तिसऱ्यांदा पंतप्रधान होऊ द्या, सहा महिन्यांत पाकव्याप्त काश्मीरही भारताचा भाग झाल्याचे दिसेल- योगी आदित्यनाथ
4
विदर्भात विजांच्या कडकडाटासह पाऊस, मुंबईत कशी असणार स्थिती?; असा आहे हवामान अंदाज
5
एक चेंडू छतावर, दुसरा स्टँडवर! Virat Kohli चा नवा विक्रम, पण ज्याची भीती होती तेच झालं
6
विभव कुमार यांच्या अटकपूर्व जामीन याचिकेवर न्यायालयाचा आदेश; म्हणाले...
7
विमान प्रवास करताना कान दुखतो का? 'या' 5 सोप्या टिप्स फॉलो करा, नक्कीच वाटेल 'रिलॅक्स'!
8
धक्कादायक! पुणे-सोलापूर हायवेवर होर्डिंग कोसळून दोन जण जखमी 
9
परळीत लोकशाही नव्हे तर गुंडाराज?; व्हिडीओ पोस्ट करत रोहित पवारांचा सवाल
10
"मुंबई बॉम्बहल्ल्यातील आरोपी प्रचारात पाहून बाळासाहेबांच्या आत्म्यालाही वेदना होत असतील"
11
अजितचा स्वभाव मला माहीत आहे, तो कधीही...; निवडणुकीच्या अंतिम टप्प्यात पवारांचं मोठं वक्तव्य
12
Rohit Sharma अखेर व्यक्त झाला! मुंबई इंडियन्सच्या अपयशाचं खरं कारण सांगितलं, म्हणाला... 
13
निस्वार्थी सुरेश रैना! विराट कोहलीनं सांगितली जगाला माहीत नसलेली Mr. IPL ची गोष्ट, Video 
14
आधी पाया पडते, पदर पसरते म्हणणारे आता गुरगुरत आहेत; जरांगेंची मुंडे बहीण-भावावर टिका
15
MS Dhoniची फिल्ड प्लेसमेंट, रोहितचा पूल शॉट अन्....; विराटला हवी आहेत ६ खेळाडूंची कौशल्य
16
32000 रुपयांचा बँक बॅलन्स, 9 लाखांचे शेअर्स... स्वाती मालीवाल यांच्याकडे किती संपत्ती? जाणून घ्या...
17
Ashok Gehlot : "काँग्रेसचं सरकार असतानाही राम मंदिर बांधलं असतं कारण..."; अशोक गेहलोत यांचा मोठा दावा
18
दादा कोंडकेंच्या 'मुका घ्या मुका' चित्रपटाची अलका कुबल यांना होती ऑफर पण...
19
PM नरेंद्र मोदींची आज दिल्लीत सभा, १३ देशांचे राजदूत उपस्थित राहणार!
20
"भारतापेक्षा अधिक तेजस्वी, प्रखर लोकशाही जगात कुठेही नाही"; व्हाईट हाऊसने केली स्तुती

कोकण रेल्वे भरली तुडुंब; प्रवाशांची कायम तोबा गर्दी; प्रतीक्षा यादी पोहोचली ७६ हजार पार

By ऑनलाइन लोकमत | Published: May 04, 2024 3:48 PM

मध्य रेल्वेवरून कोकणात जाणाऱ्या १८ रेल्वेगाड्यांच्या प्रतीक्षा यादीत

रत्नागिरी : काेकण रेल्वेमुळे मुंबईकरांचा प्रवास सुखकर झाल्याने या मार्गावरील गाड्यांना प्रवाशांची माेठी गर्दी असते. सण, उत्सवाबराेबरच उन्हाळी सुटीत काेकणात येणाऱ्या प्रवाशांची संख्या अधिक असल्याने मध्य आणि कोकण रेल्वेवरील नियमित रेल्वेगाड्यांची प्रतीक्षा यादी २०० पेक्षा अधिक असते. मात्र, गेल्या आर्थिक वर्षात जनशताब्दी आणि कोकणकन्या एक्स्प्रेस गाड्यांची प्रतीक्षा यादी प्रत्येकी ७६ हजार पार गेली होती. तसेच मध्य रेल्वेवरून कोकणात जाणाऱ्या १८ रेल्वेगाड्यांच्या प्रतीक्षा यादीत सुमारे ५ लाख प्रवाशांचा समावेश असल्याची माहिती समोर आली आहे.काेकण रेल्वे मार्गावरील गाड्यांचे आरक्षण सुरू झाल्यानंतर काही कालावधीतच प्रतीक्षा यादी सुरू होते. १ एप्रिल २०२३ ते १५ फेब्रुवारी २०२४ या कालावधीत एकूण ४ लाख ७३ हजार ९४८ प्रवाशांना आरक्षित तिकिटे मिळाली नाहीत. साधारणपणे एका दिवसाला सरासरी १,४९० प्रवासी प्रतीक्षा यादीत होते. मुंबई-मडगाव जनशताब्दी एक्स्प्रेसची प्रतीक्षा यादी ७६,४३७ इतकी असून, त्यातील ६८,५५५ प्रवासी द्वितीय श्रेणी डब्यांच्या प्रतीक्षा यादीत होते.दुसऱ्या स्थानावर मुंबई-मडगाव कोकणकन्या एक्स्प्रेस असून, या गाडीची प्रतीक्षा यादी ७६,०१८ इतकी असून, यामधील ६०,६४२ प्रवासी हे शयनयान डब्यांच्या प्रतीक्षा यादीत होते. या दोन्ही एक्स्प्रेसची प्रतीक्षा यादी ७६ हजार पार गेली होती.सध्या सीएसएमटीवरून मडगावला जाणाऱ्या जनशताब्दी एक्स्प्रेसच्या द्वितीय श्रेणीची प्रतीक्षा यादी ४०० पार झाली आहे. तर, २८ एप्रिलपासून ते १५ मेपर्यंत अनेक दिवसांतील प्रतीक्षा यादीचीही क्षमता संपली आहे. तसेच सीएसएमटीवरून मडगावला जाणाऱ्या कोकणकन्या एक्स्प्रेसच्या शयनयान डब्यांची प्रतीक्षा यादी ३०० ते ४०० दरम्यान आहे.

कोकणात जाणाऱ्या प्रवाशांची एकूणच प्रतिदिन प्रतीक्षा यादी आणि सर्वसाधारण तिकिटावर प्रवास करणाऱ्या प्रवाशांची संख्या पाहून रेल्वे प्रशासनाने चिपळूण, रत्नागिरी आणि सावंतवाडीसाठी कायमस्वरूपी वाढीव रेल्वे सोडणे आवश्यक आहे. तसेच या फेऱ्या सीएसएमटी, एलटीटी, दादर, पुणे, नागपूर येथून सोडल्यास प्रवाशांच्या गर्दीवर नियंत्रण मिळवणे शक्य आहे. - जयवंत दरेकर, संस्थापक अध्यक्ष, काेकण विकास समिती.

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीKonkan Railwayकोकण रेल्वेpassengerप्रवासी