शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

Uday Samant: 'ती' भाजपची जुनी पद्धतच, मंत्री उदय सामंतांनी लगावला टोला

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 3, 2022 15:58 IST

मुख्यमंत्र्यांनी अपक्षांची बैठक का बाेलावली हे विचारण्याचा मला अधिकार नाही. ताे त्यांचा अधिकार आहे. अपक्षांच्या विकासात्मक काही अडीअडचणी असतील त्या साेडविण्यासाठी त्यांनी बैठक बाेलावली असेल.

रत्नागिरी : रत्नागिरी विमानतळाचे काम संपत आले आहे याची जाणीव भाजपवाल्यांना झाली आहे. ही त्यांची एक स्टाईल आहे. काम पूर्ण होत असल्याचे दिसले की, आम्हीच केले हे दाखविण्याची त्यांची पद्धत आहे. श्रेय कोणालाही घेऊ देत पण रत्नागिरीच्या धावपट्टीवरुन विमान टेकऑफ झाले पाहिजे, ही आमची जबाबदारी आहे. त्यासाठीच राज्य सरकारने निधी दिला आहे, अशी स्पष्ट भूमिका उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी मांडली.मंत्री उदय सामंत शुक्रवारी रत्नागिरी दौऱ्यावर आले होते. यावेळी त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी रत्नागिरीचे विमानतळ लवकरच सुरु होणार असल्याचे सांगितले.अपक्षांची बैठक झाल्यानंतरच कळेलमुख्यमंत्र्यांनी अपक्षांची बैठक का बाेलावली हे विचारण्याचा मला अधिकार नाही. ताे त्यांचा अधिकार आहे. अपक्षांच्या विकासात्मक काही अडीअडचणी असतील त्या साेडविण्यासाठी त्यांनी बैठक बाेलावली असेल. ती बैठक झाल्यानंतरच त्यांनी बैठक का बाेलावली आहे, हे कळेल, असे मत मंत्री उदय सामंत यांनी व्यक्त केले.ही 'त्यांची' एक स्टाईलविमानतळाच्या कामाकडे खासदारांचे दुर्लक्ष हाेत असल्याचा आराेप भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी केला आहे. विमानतळाचे काम नारायण राणे यांच्या प्रयत्नातून पूर्ण करण्यात येणार असल्याचे भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी म्हटले आहे. त्याबाबत मंत्री सामंत यांना विचारले असता ते म्हणाले की, त्यांना मी शुभेच्छा देताे. रत्नागिरी विमानतळाचे काम संपत आले आहे याची जाणीव भाजपवाल्यांना झाली आहे. ही त्यांची एक स्टाईल आहे. काम पूर्ण हाेत असल्याचे दिसले की, आम्हीच केले हे दाखविण्याची त्यांची पद्धत आहे. खरंतरं मला आनंद वाटताे, मला त्यांचे अभिनंदन करायचे आहे. त्यांनी रत्नागिरीकरांना दाखवून दिले आहे की, रत्नागिरी विमानतळाचे काम आता हाेणार आहे.ही आमची जबाबदारीखासदार विनायक राऊत यांनी चिपीचे विमानतळ सुरु करून दाखवले. रत्नागिरीच्या बाबतीत ते सकारात्मक असून, या विमानतळासाठी राज्य सरकारने १०० काेटी रुपये दिले आहेत. त्यासंदर्भातील भूसंपादनाची नाेटीस देणे, त्यासाठी बैठका घेणे हे मी स्वत: केले आहे. त्यामुळे श्रेय काेणालाही लाटू दे त्याच्याशी मला घेणदेण नाही. हा रत्नागिरीकरांच्या विकासाचा प्रश्न आहे. या धावपट्टीवरुन विमान टेकऑफ झाले पाहिजे, ही आमची जबाबदारी आहे. त्यासाठीच राज्य सरकारने निधी दिला आहे, असे मंत्री उदय सामंत म्हणाले.

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीUday Samantउदय सामंतBJPभाजपा