ब्रेक फेल झाल्याने हातखंबा येथे भीषण अपघात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 26, 2021 12:53 PM2021-02-26T12:53:33+5:302021-02-26T12:54:22+5:30

Accident Ratnagiri- ब्रेक फेल झालेल्या मालवाहू ट्रकने चार वाहनांना ठोकर दिल्याने दोन वाहने हातखंबा येथील दर्ग्यासमोरच्या दरीत कोसळून अपघात झाल्याची घटना मुंबई - गोवा महामार्गावरील हातखंबा येथे शुक्रवारी सकाळी घडली. या अपघातात सहाजण जखमी झाल्याचे सांगण्यात येत आहे.

Terrible accident at Hatkhamba due to brake failure | ब्रेक फेल झाल्याने हातखंबा येथे भीषण अपघात

ब्रेक फेल झाल्याने हातखंबा येथे भीषण अपघात

googlenewsNext
ठळक मुद्देब्रेक फेल झाल्याने हातखंबा येथे भीषण अपघात हातखंबा बनतोय अपघात क्षेत्र

रत्नागिरी : ब्रेक फेल झालेल्या मालवाहू ट्रकने चार वाहनांना ठोकर दिल्याने दोन वाहने हातखंबा येथील दर्ग्यासमोरच्या दरीत कोसळून अपघात झाल्याची घटना मुंबई - गोवा महामार्गावरील हातखंबा येथे शुक्रवारी सकाळी घडली. या अपघातात सहाजण जखमी झाल्याचे सांगण्यात येत आहे.

मुंबई - गोवा महामार्गावरील हातखंबा येथे अपघातांचे प्रमाण वाढत असून, हा स्पॉट अपघातग्रस्त बनत आहे. हातखंबा येथील उतारात दर्ग्याजवळ मालवाहू ट्रक आला असता त्याचे ब्रेक फेल झाले. त्यामुळे चालकाचा ट्रकवरील ताबा सुटला आणि ट्रकने समोरील चार वाहनांना ठोकर दिली. त्यातील दोन वाहने दर्ग्यासमोरच्या दरीत कोसळली.

तर दोन वाहने रस्त्यालगतच पडली होती. या अपघातात सहाजण जखमी झाल्याची माहिती मिळत असून, जखमींना जगदगुरू नरेंद्राचार्यजी महाराज संस्थानच्या रुग्णवाहिकेने जिल्हा रुग्णालयात आणण्यात आले आहे.

या अपघातानंतर पोलिसांनी घटनास्थळी जाऊन मदत कार्य सुरू केले. दरम्यान, या अपघातातील वाहनांचे मोठे नुकसान झाले असून, वाहनांच्या समोरील भागाचा चक्काचूर झाला आहे.
 

Web Title: Terrible accident at Hatkhamba due to brake failure

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.