शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

लांजात दहा किलो वजनाचे खवले जप्त, एकाला अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 7, 2020 14:41 IST

Crime News, Ratnagiri, Police, wildlife खवल्या मांजराच्या खवल्यांची तस्करी करणाऱ्या एकाला लांजा तालुक्यातील रूण येथे अटक करण्यात आली असून, त्याच्याकडून दहा किलो खवले जप्त करण्यात आले आहेत. जितेंद्र सुरेश चव्हाण असे या संशयित आरोपीचे नाव असून, तो लांजा तालुक्यातील साटवली गावचा रहिवासी आहे.

ठळक मुद्देलांजात दहा किलो वजनाचे खवले जप्त, एकाला अटकरत्नागिरीच्या स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने केली कारवाई

लांजा : खवल्या मांजराच्या खवल्यांची तस्करी करणाऱ्या एकाला लांजा तालुक्यातील रूण येथे अटक करण्यात आली असून, त्याच्याकडून दहा किलो खवले जप्त करण्यात आले आहेत. जितेंद्र सुरेश चव्हाण असे या संशयित आरोपीचे नाव असून, तो लांजा तालुक्यातील साटवली गावचा रहिवासी आहे.रत्नागिरीच्या स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने ही कारवाई केली आहे. एक व्यक्ती रूण येथे खवले विकण्यासाठी येत असल्याची माहिती गुन्हे अन्वेषण शाखेला मिळाली होती. त्यानुसार लगेचच सापळा रचण्यात आला. सायंकाळी साडेसहाच्या सुमारास जितेंद्र चव्हाण खवले घेऊन आला.

जी व्यक्ती खवले विकत घेणार होती, त्या व्यक्तीची तो वाट पाहत होता. त्याचवेळी पोलिसांनी त्याला पकडले. त्याच्याकडे दहा किलो खवले सापडले आहेत. त्याला तातडीने लांजा पोलीस स्थानकात नेण्यात आले. तेथे त्याच्यावर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली.या मोहिमेत गुन्हा अन्वेषण शाखेचे पोलीस उपनिरीक्षक विकास चव्हाण, सहाय्यक पोलीस फौजदार माने, पी. एन. दरेकर, हेडॉन्स्टेबल बागणे, डोमणे, झोरे, बाभूळ, भोसले, पालकर, दत्ता कांबळे हे सहभागी झाले होते. औषधी गुणधर्म असल्याने या खवल्यांना आंतरराष्ट्रीय बाजारात खूप मोठी मागणी आहे. लांजात करण्यात आलेल्या या कारवाईत जप्त करण्यात आलेले खवले लाखो रूपये किमतीचे असल्याचा अंदाज पोलिसांनी वर्तवला आहे. 

टॅग्स :wildlifeवन्यजीवCrime Newsगुन्हेगारीRatnagiriरत्नागिरीPoliceपोलिस