शहरं
Join us  
Trending Stories
1
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
2
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
3
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
4
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
5
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
6
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
7
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
8
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
9
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
10
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
11
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
12
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
13
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
14
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
15
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
16
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
17
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
18
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
19
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
20
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
Daily Top 2Weekly Top 5

रत्नागिरीत नेमणार तात्पुरते शिक्षक, मानधनातही केली वाढ; पालकमंत्री उदय सामंतांची घोषणा

By मनोज मुळ्ये | Updated: June 21, 2023 18:12 IST

रत्नागिरी जिल्ह्यात शिक्षकांच्या जागा मोठ्या प्रमाणात रिक्त

रत्नागिरी : जिल्ह्यात शिक्षकांच्या जागा मोठ्या प्रमाणात रिक्त आहेत. न्यायालयीन खटल्यामुळे भरती थांबली आहे. मात्र मुलांचे शिक्षण थांबू नये, यासाठी ७०० ते १००० तात्पुरते शिक्षक नेमण्यात येतील. ही भरतीही ग्राम पातळीवरच केली जाईल, अशी माहिती पालकमंत्री उदय सामंत यांनी दिली.रत्नागिरीत बुधवारी एका पत्रकार परिषदेत त्यांनी या महत्त्वपूर्ण निर्णयाची घोषणा केली. जिल्ह्यातील ६२७ शिक्षकांची आंतरजिल्हा बदली झाली आहे. आधीच शिक्षकांच्या जागा रिक्त होत्या. त्यात या जिल्हा बदलीमुळे रिक्त जागांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे.शिक्षक भरतीबाबत न्यायालयामध्ये खटला सुरू आहे. मात्र त्यामुळे भरती थांबली असली तरी शिक्षण थांबता नये, यासाठी ७०० ते १००० तात्पुरते शिक्षक नेमण्याचा निर्णय आपण घेतला आहे. इतर जिल्ह्यात अशा तात्पुरत्या शिक्षकांना पाच हजार रुपये मानधन दिले जात आहे. रत्नागिरी जिल्ह्यात अशा शिक्षकांना ९ हजार रुपये मानधन दिले जाणार आहे. त्यासाठी ११ महिन्यांचा करार केला जाणार असल्याचेही त्यांनी सांगितले.ही भरती गावपातळीवरच केली जाणार आहे. ज्या गावातील शाळेत रिक्त जागा आहे, त्याच गावातील पात्र उमेदवार त्यासाठी निवडला जाईल, असेही मंत्री सामंत यांनी सांगितले.

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीTeacherशिक्षकSchoolशाळाUday Samantउदय सामंत