शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
3
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
4
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
5
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
6
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
7
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
8
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
9
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
10
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
11
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
12
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
13
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
14
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
15
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
16
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
17
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
18
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
19
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
20
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
Daily Top 2Weekly Top 5

शिक्षक प्रवीण किणे निलंबित, रत्नागिरी जिल्हा परिषदेकडून कारवाई; प्रशासनाच्या बदनामीसह विविध कारणांचा ठपका 

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 25, 2024 14:03 IST

रत्नागिरी : सोशल मीडियावर शासनाविरोधात नागरिकांना भडकवणे, प्रशासनाला बदनामी करणे, शाळेत सहकारी तसेच व्यवस्थापन समितीमध्ये मतभेद करणे, शाळेचा संगणक ...

रत्नागिरी : सोशल मीडियावर शासनाविरोधात नागरिकांना भडकवणे, प्रशासनाला बदनामी करणे, शाळेत सहकारी तसेच व्यवस्थापन समितीमध्ये मतभेद करणे, शाळेचा संगणक घरी घेऊन जाणे, पावती पुस्तकावर मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांची परवानगी न घेताच नाव छापणे आदी कारणांचा ठपका ठेवत रत्नागिरी तालुक्यातील कशेळी शाळेतील शिक्षक प्रवीण किणे यांना निलंबित करण्याची कारवाई जिल्हा परिषद प्रशासनाने केली आहे, अशी माहिती मुख्य कार्यकारी अधिकारी कीर्तीकिरण पुजार यांनी दिली.कशेळी शाळेतील या पदवीधर शिक्षकाविरोधातजिल्हा परिषदेकडे तक्रारी दाखल झाल्या होत्या. त्यानुसार चौकशी समिती नेमून चौकशी करण्यात आली. या चौकशीमध्ये हा शिक्षक प्रथमदर्शनी दोषी आढळला आहे. यामुळे त्याच्यावर गुरुवारी जिल्हा परिषद प्रशासनाने निलंबनाची कारवाई केली आहे.शासकीय सेवेत असताना सोशल मीडियावर शासनाच्या विरोधात नागरिकांना भडकवणे, तसेच शासनाची बदनामी करणे, निर्भय बनो या व्हाॅटस्ॲप समूहावर शासनाविरोधात पोस्ट स्वत:च्या मोबाइलवरून केली असल्याचे चौकशी समितीकडील अहवालावरून सिद्ध होत आहे. शाळेतील शिक्षकांचे आपापसातील मतभेदामुळे शैक्षणिक दर्जा खालावत असून, पटसंख्येत अचानक घट दिसून आली.व्यवस्थापन समितीने दिलेल्या सूचना न पाळणे, ग्रामस्थांना, पालकांना अथवा शाळेतील कोणालाही विश्वासात न घेता मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या नावे लकी ड्रॉ कुपन पावती पुस्तक छपाई करून वर्गणी जमा करणे, तसेच शाळेतील शालेय पोषण आहारातील तांदूळ परस्पर घेऊन जाणे, शाळेतील संगणक घेऊन जाणे आदी कारणांचा ठपका ठेवत या शिक्षकाविरोधात कारवाई करण्यात आली आहे.या शिक्षकाने कर्तव्यात गंभीर स्वरूपाची कसूर करून महाराष्ट्र जिल्हा परिषद (वर्तणूक) नियम १९६७ मधील तरतुदीचा भंग केलेला आहे. यापूर्वीही या शिक्षकाने अशाच प्रकारचे गैरवर्तन केले होते, तरीही त्याच्या वर्तनात कोणत्याही प्रकारची सुधारणा झालेली दिसून येत नाही. यामुळे जिल्हा परिषद जिल्हा सेवा (शिस्त व अपील) नियम १९६४ मधील भाग २ नियम ३ (१) (अ) मधील तरतुदीनुसार प्रवीण किणे याला जिल्हा परिषद सेवेतून निलंबित करण्यात आले आहे.

या शिक्षकाचे वर्तन शिक्षकीपेशाला अशोभनीय असून त्याने आपल्या कर्तव्यात गंभीर स्वरूपाची कसूर केल्याने कारवाई करण्यात आली आहे. सध्या निलंबित करून त्याची विभागीय चौकशी करण्यात येणार आहे. - कीर्तीकिरण पुजार, मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, रत्नागिरी.

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीzpजिल्हा परिषदTeacherशिक्षक