मुंबई-गोवा महामार्गावर आंजणारी पुलाजवळ टँकर उलटून तेल गळती
By अरुण आडिवरेकर | Updated: March 16, 2023 15:44 IST2023-03-16T15:42:22+5:302023-03-16T15:44:33+5:30
लांजा : मुंबई- गोवा महामार्गावरील आंजणारी (ता. लांजा) येथील घाटीमधील तीव्र उतारावर तेलाने भरलेला टँकर उलटला. या अपघातात चालक गंभीर ...

मुंबई-गोवा महामार्गावर आंजणारी पुलाजवळ टँकर उलटून तेल गळती
लांजा : मुंबई- गोवा महामार्गावरील आंजणारी (ता. लांजा) येथील घाटीमधील तीव्र उतारावर तेलाने भरलेला टँकर उलटला. या अपघातात चालक गंभीर जखमी झाला. ही घटना आज, गुरुवारी (दि. १६) दुपारच्या सुमारास घडली. टॅंकर उलटल्याने महामार्गावर तेल गळती झाली आहे.
टँकर मुंबईहून गोव्याच्या दिशेने जात होता. दरम्यान आंजणारी येथे तीव्र उतारावर टँकर उलटला. महामार्गावर घडलेल्या या अपघाताची माहिती मिळताच हातखंबा येथील महामार्ग पोलिस तसेच जगद्गुरु नरेंद्रचार्य महाराज संस्थानाची रुग्णवाहिका घटनास्थळी पोहोचली. या अपघातात गंभीर जखमी झालेल्या चालकाला लांजा येथील ग्रामीण रुग्णालय दाखल केले आहे.