शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! RBI कडून पेटीएमचा बँकिंग परवाना कायमचा रद्द; युजर्सवर काय परिणाम होणार...
2
इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांना कर्करोग! खुद्द स्वतःच केला धक्कादायक खुलासा; आता कशी आहे तब्येत?
3
आप फुटली, भाजपाची ताकद वाढली! राज्यसभेत आता कोणत्या पक्षाचे किती खासदार?
4
'आप'ला भगदाड, खासदारांचा मोठा गट फुटला! अरविंद केजरीवाल म्हणाले, "भाजपाने पुन्हा..."
5
नेपाळमध्ये भारतीय भाविकांच्या बसला अपघात; २१ जण जखमी, ६ वर्षांच्या चिमुरडीसह एका महिलेचा मृत्यू
6
तरुणीला 'हाय' केले अन् वाद पेटला; लग्नातील वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात, एकाचा मृत्यू ८ जण जखमी, विकासकाविरुद्ध गुन्हा 
7
Latest Marathi News LIVE Updates: आम आदमी पक्षाला मोठा धक्का; राज्यसभेचे ७ खासदार फुटले, भाजपात प्रवेश करणार
8
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमारांना हटवण्याची मागणी; ७३ खासदारांचे सभापतींना पत्र
9
९०% मार्क्स, आयआरएससोबत वडिलांची ओळख अन् लक्झरी लाईफचं वेड; हुशार राहुल मीणा गुन्हेगार कसा झाला?
10
Raghav Chadha: राघव चड्ढा, हरभजनसिंग भाजपात! आम आदमी पार्टीत उभी फूट, राज्यसभेच्या १० पैकी ७ खासदारांचा पक्षाला 'राम-राम'
11
Raghav Chadha : राघव चड्ढांनी २१ दिवसांपूर्वीच दिले होते 'आप'मधील फुटीचे संकेत; भाकीत ठरलं खरं
12
“रिक्षा-टॅक्सी, ओला-उबेर, रॅपिडो चालकांनी मराठीत संवाद साधलाच पाहिजे”: मंत्री प्रताप सरनाईक
13
एकदम फिट दिसणाऱ्यांना का येतोय हार्ट अटॅक? डॉक्टरांनी सांगितलं 'ते' खरं कारण
14
'नरक' म्हणणाऱ्या डोनाल्ड ट्रम्प यांना चीनचे भारताचा झेंडा पोस्ट करत उत्तर; 'शब्द विरून जातात, पण...'
15
LPG Subsidy : तुमच्या सिलिंडरचं अनुदान खात्यात जमा होतंय का? घरबसल्या स्टेटस तपासण्याची सोपी पद्धत
16
दमदार इंजिनसह BMW ने भारतात लॉन्च केली सर्वात स्वस्त बाईक, जाणून घ्या किंमत अन् फीचर्स...
17
इन्स्टाग्राम युजर्सना मोठा धक्का! रंगीत फोटो झाले काळे-पांढरे; मिनिटांत करा दुरुस्त, फॉलो करा या सोप्या स्टेप्स
18
"मी त्याच्याशीच लग्न करणार...", बिग बॉस विजेती तन्वी कोलतेने केला खुलासा; प्रेमाबद्दल म्हणाली...
19
राजकारणात येण्यापूर्वी काय करायचे राघव चड्ढा; आपने ग्लॅमरस मोहरा गमावला... 
20
सावधान! फळ आणि भाज्या खाल्ल्याने वाढतोय कॅन्सरचा धोका? नव्या रिसर्चने सर्वच हादरले
Daily Top 2Weekly Top 5

प्रवेश अर्जांसाठी उडाली झुंबड

By admin | Updated: June 28, 2014 00:31 IST

अकरावी प्रवेश : विद्यार्थ्यांपेक्षा पालकांचीच धावाधाव अधिक...

रत्नागिरी : दहावीच्या परीक्षेचा निकाल जाहीर झाला असून, विद्यार्थ्यांना गुणपत्रकांचे वितरण करण्यात आहे. कनिष्ठ महाविद्यालयातून आजपासून अकरावी प्रवेश अर्जांचे वितरण सुरू करण्यात आले आहे. आयटीआय प्रवेश प्रक्रिया आॅनलाईन पध्दतीने सुरू करण्यात आली आहे. मात्र, दरवर्षीप्रमाणे वेबसाईट खुली न झाल्यामुळे सायबर कॅफेमध्ये विद्यार्थी, पालकांची गर्दी दिसून येत होती.महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या कोकण बोर्डातर्फे घेण्यात येणाऱ्या दहावीच्या परीक्षेत २६ हजार ५२३ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. अकरावीसाठी जिल्ह्यात २१ हजार ७४० इतकी प्रवेश क्षमता आहे. शिक्षण विभागाने २७ ते २९ जूनपर्यंत प्रवेश अर्ज वितरणाचे नियोजन केले आहे. चालू शैक्षणिक वर्षात स्वयंअर्थसहायित नवीन १७ महाविद्यालये सुरू होणार आहेत. शिवाय १० ते १२ तुकडीवाढीचे प्रस्ताव प्रस्तावित आहेत. कनिष्ठ महाविद्यालयातून अर्ज वितरण सुरू असल्याने अर्ज मिळविण्यासाठी विद्यार्थी व पालकांची गर्दी झाली होती. शिवाय आयटीआय व पॉलिटेक्निकलचे प्रवेश आॅनलाईन पध्दतीने सुरू झाले आहेत. त्यामुळे प्रवेश अर्ज भरण्यासाठी सायबर कॅफेमध्ये विद्यार्थी व पालकांची गर्दी झालेली दिसून येत होती. आयटीआयची वेबसाईट बंद असल्यामुळे पालक - शिक्षक ताटकळत उभे होते. २७ ते २९ जून या कालावधीत प्रवेश अर्जांचे वितरण केले जाणार आहे. ३० जून ते २ जुलैअखेर प्रवेश अर्जांची छाननी, गुणवत्तेनुसार प्रतीक्षा यादी तयार केली जाणार आहे. ३ रोजी दुपारी ३ वाजेपर्यंत प्रतीक्षा यादी प्रसिध्द केली जाणार आहे. दि. ४ ते ८ जुलै रप्रवेश प्रक्रिया सुरू होणार आहे. ९ व १० रोजी प्रवेश शिल्लक असल्यास प्रवेश दिले जाणार आहेत. ११ व १२ रोजी दुसऱ्या प्रतीक्षा यादीतील विद्यार्थ्यांना प्रवेश दिला जाणार आहे. १४ व १५ रोजी रिक्त राहिलेल्या जागांवर एटीकेटीधारक विद्यार्थ्यांना प्रवेश दिले जाणार आहेत. १६ जुलैपासून अकरावीचे वर्ग सुरू करण्याची सूचना शिक्षण विभागाने दिली आहे. त्यानुसार शाळा, कनिष्ठ महाविद्यालयांतून प्रक्रिया सुरू झाल्याचे दिसून येत होते. ही प्रक्रिया पुढील काही दिवस सुरु राहणार आहे. (प्रतिनिधी)