देवरुख : देवरुख तालुका कृषी कार्यालयातील कृषी सहाय्यक तरुणीने गळफास घेऊन आत्महत्या केली. पूजा शिवकुमार रजपूत (वय-२८, मुळ गाव उस्मानाबाद, सध्या रा. देवरूख, ता. संगमेश्वर) असे आत्महत्या केलेल्या तरूणीचे नाव आहे. ही घटना आज, शनिवारी उघडकीस आली.अधिक माहिती अशी की, पूजा रजपूत ही संगमेश्वर तालुका कृषी कार्यालयात कृषी सहाय्यक पदावर गेली चार वर्षे कार्यरत होती. मात्र तीने अचानकच आत्महत्या करण्याचा टोकाचा निर्णय घेतला.या घटनेची माहिती मिळताच देवरूख पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक बाळकृष्ण जाधव सहकाऱ्यांसमवेत घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी घटनेचा पंचनामा करण्यास सुरू केली. मात्र आत्महत्येचं नेमकं कारण अद्याप अस्पष्ट झालेले नाही.
देवरूखात कृषी सहाय्यक तरूणीची गळफास घेऊन आत्महत्या
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 9, 2022 15:54 IST