रत्नागिरीत व्यावसायिकाची आत्महत्या, कारण गुलदस्त्यात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 24, 2020 19:40 IST2020-12-24T19:38:52+5:302020-12-24T19:40:37+5:30
Suicide Ratnagiri- रत्नागिरीतील बांधकाम व्यावसायिक चंद्रकांत शांतीलाल पटेल यांनी गुरुवारी पहाटे इमारतीवरून उडी घेत आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. पहाटे ५.३० वाजता मॉर्निंग वॉकसाठी बाहेर पडलेल्या महिलेने त्यांचा मृतदेह पाहिल्यानंतर हा प्रकार उघडकीला आला. त्यानंतर शहरात एकच खळबळ उडाली.

रत्नागिरीत व्यावसायिकाची आत्महत्या, कारण गुलदस्त्यात
रत्नागिरी : रत्नागिरीतील बांधकाम व्यावसायिक चंद्रकांत शांतीलाल पटेल यांनी गुरुवारी पहाटे इमारतीवरून उडी घेत आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. पहाटे ५.३० वाजता मॉर्निंग वॉकसाठी बाहेर पडलेल्या महिलेने त्यांचा मृतदेह पाहिल्यानंतर हा प्रकार उघडकीला आला. त्यानंतर शहरात एकच खळबळ उडाली.
शहरातील माळनाका येथील तारा ऑर्किड येथे चंद्रकांत पटेल वास्तव्याला होते. दोन महिन्यांपूर्वी लॉकडॉऊन उठल्यानंतर ते आपल्या मूळ गावाला गेले होते. तिथे गेल्यानंतर त्यांना कोरोनाची लागण झाली होती. कोरोनावर त्यांनी यशस्वी मातही केली होती. दोन महिने ते घरीच होते. एक दिवसापूर्वी ते आपल्या वडिलांसह रत्नागिरीत परतले होते. गुरुवारी पहाटेच्या सुमाराला त्यांनी आपल्या फ्लॅटला बाहेरून कडी लावली आणि इमारतीच्या चौथ्या मजल्यावरून उडी घेत आत्महत्या केली.
सकाळी साडेपाच वाजता मॉर्निंग वॉकसाठी बाहेर पडलेल्या महिलेला त्यांचा मृतदेह रक्ताच्या थारोळ्यात पडलेला दिसला.पटेल यांच्या आत्महत्येचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. त्यांची आर्थिक परिस्थितीही चांगली होती. २ ते ३ इमारती त्यांनी स्वतः उभ्या केल्या असून, रत्नागिरीत त्यांचे स्वतःच्या मालकीचे ३ ते ४ फ्लॅट आहेत. असे असताना गावातून परतल्यानंतर अचानक त्यांनी आत्महत्या का केली हा प्रश्न सर्वांनाच पडला आहे.