Ratnagiri: राष्ट्रवादी शरद पवार गटाचे जिल्हाध्यक्ष सुदेश मयेकर यांचा राजीनामा

By मनोज मुळ्ये | Updated: December 18, 2023 17:23 IST2023-12-18T17:21:55+5:302023-12-18T17:23:44+5:30

मयेकर यांनी पत्रकार परिषद घेऊन याबाबत माहिती दिली

Sudesh Mayekar District President of Nationalist Sharad Pawar Group has resigned | Ratnagiri: राष्ट्रवादी शरद पवार गटाचे जिल्हाध्यक्ष सुदेश मयेकर यांचा राजीनामा

Ratnagiri: राष्ट्रवादी शरद पवार गटाचे जिल्हाध्यक्ष सुदेश मयेकर यांचा राजीनामा

रत्नागिरी : राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाचे जिल्हाध्यक्ष सुदेश मयेकर यांनी प्रकृतीच्या अस्वास्थ्यामुळे आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांना त्यांनी तसे पत्र पाठवले आहे. मयेकर यांनी सोमवारी पत्रकार परिषद घेऊन याबाबत माहिती दिली.

अजित पवार यांनी राष्ट्रवादीतून बाहेर पडण्याचा निर्णय घेतल्यानंतर पक्षाचे तत्कालीन जिल्हाध्यक्ष बाबाजी जाधव यांनी त्यांच्यासोबत जाण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे रिक्त झालेल्या जिल्हाध्यक्ष पदावर सुदेश मयेकर यांची नियुक्ती करण्यात आली.

आपली या पदावर नियुक्ती झाली, त्याच्या काही दिवस आधीच आपल्यावर एन्जीओप्लास्टी झाली होती. आता आपल्या आजाराचा त्रास अधिक वाढला आहे. त्यामुळे आपल्याला या पदावर काम करणे शक्य नाही, असे त्यांनी आपल्या पत्रात नमूद केले आहे. आपल्याला इतक्या मोठ्या पदावर काम करण्याची संधी मिळाली. मात्र आजारपणामुळे पदाला न्याय देता येत नसल्याने आपण हे पद सोडत असल्याचे त्यांनी सांगितले.

Web Title: Sudesh Mayekar District President of Nationalist Sharad Pawar Group has resigned