शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
2
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
3
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
4
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
5
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
6
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
7
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
8
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
9
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
10
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
11
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
12
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
13
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
14
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
15
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
16
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
17
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
18
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
19
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
20
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
Daily Top 2Weekly Top 5

मुंबईतून पर्यटनासाठी रत्नागिरीत आलेल्या महिलेचा आकस्मिक मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 19, 2025 16:30 IST

रत्नागिरी : मुंबईतून पर्यटन व देवदर्शनासाठी रत्नागिरीत आलेल्या महिलेचा झोपेतच आकस्मिक मृत्यू झाल्याची घटना शनिवारी सकाळी घडली. नीता नरेंद्र ...

रत्नागिरी : मुंबईतून पर्यटन व देवदर्शनासाठी रत्नागिरीत आलेल्या महिलेचा झोपेतच आकस्मिक मृत्यू झाल्याची घटना शनिवारी सकाळी घडली. नीता नरेंद्र मेस्त्री (४९, रा. नालासोपारा, पालघर, जि. रायगड, मूळ रा. देवाचे गोठणे, ता. राजापूर) असे या महिलेचे नाव आहे.नीता मेस्त्री या त्यांची दोन मुले, दोन बहिणींच्या कुटुंबीयांसह गुरुवारी रत्नागिरीत देवदर्शनासाठी आल्या होत्या. ते रत्नागिरी शहरातील माळनाका येथील एका हॉटेलमध्ये राहत होते. शुक्रवारी सकाळी आपल्या मूळ गावी देवाचे गोठणे येथे जाऊन आले.

रात्री जेवण करुन सर्वजण झोपले होते. शनिवारी पहाटे सहाच्या सुमाराला नीता या घोरत होत्या. मात्र, अचानक त्यांचे घोरणे बंद झाले म्हणून नातेवाइकांनी त्यांना उठविण्याचा प्रयत्न केला. पण, त्या बेशुद्ध पडल्याचे नातेवाईकांच्या लक्षात आले.तातडीने त्यांना उपचारासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. तेथील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्यांना तपासून मृत घोषित केले. जिल्हा रुग्णालयाच्या पोलिस चौकीत मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीDeathमृत्यूtourismपर्यटनPoliceपोलिस