शहरं
Join us  
Trending Stories
1
'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
2
इराणकडून भारतीय जहाजांवरच गोळीबार? टँकर VLCC माघारी परतला, होर्मुझमध्ये काय घडले...
3
कर्नाटकात 'बर्ड फ्लू'चा शिरकाव! बेंगळुरूमधील पोल्ट्री फार्ममध्ये H5N1 विषाणूचा प्रादुर्भाव; हजारो कोंबड्यांना पुरले
4
राज्यात 20 ते 22 एप्रिल दरम्यान वादळी पावसाची शक्यता, 'या' जिल्ह्यांना इशारा, शेतकऱ्यांना आवाहन 
5
"अभी तो मै जवान हूँ..." फिटनेस किंग कोहलीची कमाल! २१ मीटर धावत येऊन KL राहुलच्या खेळीला लावला ब्रेक
6
क्रूरतेचा कळस! सख्ख्या भावावर कुऱ्हाडीने वार; मृतदेहाचे केले ९ तुकडे, थरकाप उडवणारी घटना
7
मोठी कारवाई! नोएडा हिंसाचार प्रकरणातील मास्टरमाइंड आदित्य आनंदला तामिळनाडूतून अटक
8
WWE नाही मनमाडच्या स्थानकावरील Video! अंगावर शहारे येतील, रेल्वेच्या ओव्हरहेड इलेक्ट्रिक खांबावर चढला माथेफिरू 
9
नाशिक TCS प्रकरण: निदा खान मुंब्र्यातील हॉस्पिटलमध्ये दोनदा आलेली; डॉक्टरांचा मोठा खुलासा, अटकपूर्व जामिनासाठी धडपड
10
जितेश शर्माला आपल्या क्रिजमध्ये पाहून क्रुणाल पांड्या गोंधळला; Run Out झाल्यावर रागही काढला (VIDEO)
11
होर्मुझच्या सामुद्रधुनीत जहाजांवर गोळीबार! इराणचा आक्रमक पवित्रा; पुन्हा युद्धाची ठिणगी?
12
आता क्युबाकडे मोर्चा वळला? अमेरिकेच्या सर्वात महागड्या ड्रोनने ६ तास घिरट्या घातल्याने खळबळ; काय आहे अमेरिकेचा गेमप्लॅन?
13
बँक ऑफ महाराष्ट्रावर दरोडा, १५ कोटी लुटीचं बिहार कनेक्शन; ५ सशस्त्र गुन्हेगारांनी २० मिनिटांत डाव साधला
14
लहानपणी वडिलांना गमावलं, आईनं शाळेत झाडू मारून शिकवलं; आज मुलगा शिक्षण मंत्रालयात बनला अधिकारी
15
JNPT बंदरात भीषण स्फोट! केमिकल प्लांटमध्ये ब्लास्ट; धुराचे लोट लांबपर्यंत
16
लोकसभेतील ५४३ जागांसाठी का लागू होऊ शकत नाही महिला आरक्षण, सरकार अन् विरोधकांचे दावे काय?
17
"जितेंद्र शेळके यांचा मृत्यू अपघात की घातपात?" अंजली दमानिया यांनी उपस्थित केले खळबळजनक प्रश्न
18
छत्तीसगढप्रकरणी अनिल अग्रवालांवर FIR, समर्थनार्थ उतरले नवीन जिंदल; म्हणाले, "ही दु:खद..."
19
तुम्हालाही रात्री २-३ वाजता अचानक खूप भूक लागते, रोजची सवय की शरीर देतंय धोक्याचा इशारा?
20
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेला शेगडी पूजनाची हमी, अन्नपूर्णेच्या आशीर्वादाने धन-धान्य पडणार नाही कमी!
Daily Top 2Weekly Top 5

उपकेंद्रांचा कारभार भाड्याच्याच जागेत

By admin | Updated: July 9, 2015 00:10 IST

संगमेश्वर तालुका : जागा मिळवण्यासाठी आरोग्य विभागाची धडपड

सचिन मोहिते -देवरुख -संगमेश्वर तालुक्यातील आरोग्य विभागाच्या उपकेंद्राचा प्रश्न सध्या ऐरणीवर आला असून, तालुक्यातील अनेक उपकेंद्र गेली कित्येक वर्षे भाड्याच्या जागेतून आरोग्याचा गाडा हाकत आहेत. तालुक्यात ५५ उपकेंद्रांपैकी तब्बल २४ उपकेंद्र तूटपंज्या भाडेतत्त्वावरील जागेत आरोग्याचा गाडा हाकत असल्याची केविलवाणी स्थिती आहे. प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गंत येणाऱ्या उपकेंद्रांची संख्या एकूण ५५ इतकी आहे. त्या ५५ उपकेंद्रांतील २४ उपकेंद्र भाड्याच्या इमारतीतून चालवण्यात येत आहेत.उपकेंद्रासाठी तेथील ग्रामपंचायतीने जागा उपलब्ध करुन देणे गरजेचे आहे. मात्र, आजपर्यंत जागेअभावी ही २४ उपकेंद्र भाड्याच्या खोलीतूनच चालवली जात आहेत. मात्र, तेथील स्थानिक लोकप्रतिनिधींकडून याबाबत कोणतीच ठोस पावले उचलली जात नसल्याचे दिसत आहे. आरोग्य प्रशासन याबाबत कोणताच ठोस निर्णय घेऊ शकत नाही. जागा उपलब्ध होत नसल्यास मंजूर असलेली उपकेंद्र लगतच्या गावात स्थलांतरित करावीत, असा आदेश जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांनी तालुका आरोग्य कार्यालयाला पत्राद्वारे दिला आहे.या आदेशामुळे एकतर तेथील भाड्याच्या जागेत असणारी उपकेंद्र इमारतीमध्ये येण्यास मदत होणार आहे. तसेच ज्या ग्रामपंचायती आजपर्यंत या विषयाकडे गांभीर्याने पाहात नाहीत, अशा ग्रामपंचायतींनाही जाग येऊन आपल्या गावातील उपकेंद्र दुसऱ्या ठिकाणी स्थलांतरित होईल, या भीतीपोटी तरी तेथे जागा उपलब्ध होण्यास मदत होणार आहे, या बाबीची गांभीर्याने अंमलबजावणी झाल्यास उपकेंद्रांच्या भाड्याच्या जागेतील वनवास लवकरच संपुष्टात येणार आहे.भाड्याच्या जागेमध्ये आपला आरोग्याचा गाडा हाकणाऱ्या उपकेंद्रांमध्ये कोळंबे पांगरी, वांद्री, नायरी, कारभाटले, कसबा, मांजरे, कोंडअसुर्डे, नांदळज, तेऱ्ये, भोवडे, ओझरे बु., बोरसूत, ओझरे खुर्द, देवळे, तिवरे, बुरंबाड, धामापूर, करजुवे, आंबव, कडवई, राजिवली, आंगवली आणि मारळ यांचा समावेश आहे. या चोवीस उपकेंद्रांपैकी १८ उपकेंद्रांच्या इमारतींना जागाच उपलब्ध नसल्याने या ठिकाणी स्थलांतर करावे लागणार असल्याची शक्यता निर्माण झाली आहे.