शहरं
Join us  
Trending Stories
1
विधान परिषदेच्या एका जागेसाठी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये ४ नावांवर चर्चा, विक्रम काकडे यांचं नाव आघाडीवर
2
'चंद्रकांता' फेम भरत कपूर यांचं निधन, वयाच्या ८६ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास; अभिनयाचा चार दशकांचा प्रवास थांबला
3
"न कळत सारं घडलं..." लाजिरवाण्या पराभवानंतर अक्षर पटेल झाला 'कावरा बावरा', म्हणे...
4
वेगळ्या घोषणेची गरज नाही, भारत आधीपासूनच हिंदूराष्ट्र - सरसंघचालक मोहन भागवत
5
Bhuvneshwar Kumar : स्विंगचा किंग भुवीची पॉवरप्लेमध्ये कमाल! एकाच डावात दोन खास विक्रमांना गवसणी
6
मुंबई सीएसएमटीवरून सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा घसरला, सुदैवाने सर्व प्रवासी सुरक्षित!
7
चंद्रपुरातील किडनी विक्री प्रकरणात रविंद्रपाल सिंग यांना जामीन नाहीच, हायकोर्टाचा निर्णय; सखोल तपासासाठी अर्ज फेटाळला
8
एमआयडीसीतील फॅक्टरींमध्ये अनेक कामगारांचे पोलिस व्हेरिफिकेशनच नाही; ना कागदपत्र, ना कुणाची नोंद
9
Virat Kohli New Record : किंग कोहलीचा 'विराट' पराक्रम! IPL मध्ये ९००० धावांसह रचला नवा विक्रम
10
२६ कामगारांचा बळी घेणाऱ्या एसबीएल कंपनीतील पाच पदाधिकाऱ्यांना दणका; उच्च न्यायालयाचा अटकपूर्व जामिनास नकार
11
यवतमाळ जिल्हा बँकेचे मुदतवाढ मिळालेले संचालक मंडळ अखेर बरखास्त; उपनिबंधकांकडे कारभार, संचालक मंडळाच्या मनसुब्यावर पाणी 
12
विदर्भातील सहा शहरांमध्ये ‘सन’ताप कायम, आणखी २४ तास उष्णतेची लाट; मात्र अर्धे जिल्हे अवकाळीच्या सावटात
13
DC vs RCB : हिशोब चुकता! दिल्ली कॅपिटल्सच्या घरच्या मैदानात रॉयल चॅलेंजर्सनं ३९ चेंडूत संपवली मॅच
14
Top Marathi News Live: मुंबई सीएसएमटीवरुन सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा पुणे स्थानकात घसरला
15
"५१ अंशांच्या उन्हातही काही होणार नाही, माझ्या गाडीत AC चालत नाही"; ज्योतिरादित्य शिंदेंनी सांगितला उष्णतेच्या लाटेपासून बचावाचा देशी उपाय!
16
महाराज आला रे! मोठ्या धक्क्यातून सावरण्यासाठी Mumbai Indians नं खेळली 'ही' चाल
17
१ मे पासून LPG गॅसचे नियम बदलणार? सिलिंडर हवा असेल तर 'DAC' कोड द्यावा लागणार; पाहा नवे बदल
18
DC vs RCB: ८ धावांत ६ विकेट्स! भुवी-हेजलवूडमध्ये विकेट घेण्याची स्पर्धा; दिल्लीकरांसाठी भयावह स्वप्न
19
भसाभस वाढतंय वीज बिल... एसी सोबत पंखा किती फायदेशीर? फक्त AC च्या 'या' आकड्याकडे लक्ष द्या; सरकारनं दिला खास 'मंत्र'
20
वॉशिंग मशीन लावून झाल्यानंतर ४० मिनिटांनी अंघोळ करायचे लक्षात ठेवा...; नाहीतर ठरू शकते जीवघेणे!
Daily Top 2Weekly Top 5

डाटा एंट्री आॅपरेटर्सचे काम बंद आंदोलन-- चिपळूण तालुक्यात संमिश्र प्रतिसाद

By admin | Updated: November 12, 2014 22:51 IST

विविध मागण्या : ग्रामपंचायतींमधील संगणकीकरणाचे कामकाज ठप्प

रत्नागिरी/असुर्डे : अन्याय होत असल्याने विविध मागण्यांच्या पूर्ततेकरिता आज बुधवारपासून जिल्ह्यातील डाटा एंट्री आॅपरेटर्सनी काम बंद आंदोलन सुरु केले़ त्यामुळे ग्रामपंचायतींमधील संगणकीकरणाचे काम ठप्प झाले आहे़ प्रत्येक ग्रामपंचायतीमध्ये संग्राम कक्ष स्थापन करण्यात आला. ग्रामस्थांना विविध प्रकारचे दाखले मिळावेत, ग्रामपंचायतीचा प्रशासकीय कारभार सुटसुटीत व्हावा, या हेतूने डाटा एंट्री आॅपरेटर्सची नियुक्ती करण्यात आली. तेराव्या वित्त आयोगातून ग्रामपंचायतीकडून दरमहा ८,८२४ रुपये वर्ग करण्यात येतात. डाटा एंट्री आॅपरेटर्सना आठ हजार रुपये मानधन निर्धारित केलेले असताना प्रत्यक्ष पदवीधारकांना ३८००, तर पदवी नसलेल्यांना ३५०० रुपये मानधन दिले जाते. शिवाय संगणकाची देखभाल दुरुस्ती, लागणारी छपाई व अन्य साहित्य वेळेवर उपलब्ध होत नाही. ग्रामपंचायतीत त्यासाठी काहीही खर्च करीत नाहीत़ संगणक परिचालकांच्या नियुक्तीपासून आतापर्यंत वेळेवर मानधन देण्यात आलेले नाही. दोन महिने उशिरा मानधन काढण्यात येत आहे. वेळोवेळी मानधनाचा प्रश्न मांडण्यात येऊनसुद्धा त्याकडे दुर्लक्ष केले जात आहे.डाटा एंट्री आॅपरेटर्सना आठ हजार रुपयांप्रमाणे दरमहा वेतन अदा करण्यात यावे. १ ते १० तारखेच्या आत मानधन जमा व्हावे, संगणक देखभाल दुरुस्तीसाठी साहित्य लवकर उपलब्ध व्हावे. दहा हजारपेक्षा अधिक लोकसंख्या असणाऱ्या गावातून दोन डाटा एंट्री आॅपरेटर्सची नियुक्ती करण्यात यावी. ज्या ग्रामपंचायतीमध्ये इंटरनेट सुविधा उपलब्ध नाही, तेथील डाटा एंट्री आॅपरेटर्सना अन्य ग्रामपंचायतीमध्ये किंवा पंचायत समितीत जाऊन काम करावे लागते. त्यासाठी त्यांना प्रतिकिलोमीटर २ रुपये प्रमाणे प्रवासभत्ता देण्यात यावा. सर्व ग्रामपंचायतींमधील संग्राम कक्षामध्ये इंटरनेटसाठी ब्रॉडबॅण्ड कनेक्शन उपलब्ध व्हावे आदी मागण्या करण्यात आल्या आहेत.सर्व डाटा एंट्री आॅपरेटर्सनी आतापर्यंत शांततेने भूमिका घेतली होती. वेळोवेळी मागण्यांचे निवेदन प्रशासनाला सादर केले होते. परंतु संबंधित मागण्या मान्य न केल्यास १२ नोव्हेंबरपासून काम बंद आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे. आॅपरेटर्सनी आजपासून काम बंद आंदोलन सुरु केले़ (शहर वार्ताहर)चिपळूण तालुक्यात संमिश्र प्रतिसादचिपळूण : नियमितपणे मासिक वेतन मिळण्यासाठी अनेकदा संघर्ष करुनही जिल्ह्यातील ग्रामपंचायतीतील डेटा आॅपरेटर्सना एकदाही मासिक वेतन वेळेत मिळालेले नाही. शासन सेवेत कायम करण्याबरोबरच विविध मागण्यांसाठी आज बुधवारपासून बेमुदत कामबंद आंदोलनाचा निर्णय घेण्यात आला होता. त्याला तालुक्यात संमिश्र प्रतिसाद मिळाला. याबाबतचे निवेदन मंगळवारी तहसीलदार वृषाली पाटील यांना देण्यात आले होते. मागील तीन वर्षापासून डेटा आॅपरेटर्स आॅनलाईनचे कामकाज करीत आहेत. महाआॅनलाईन कंपनीस ग्रामपंचायतीची कामे संगणकीकृत करण्याचा ठेका दिला होता. प्रत्यक्षात शासनाकडून महाआॅनलाईन कंपनीस ८ हजारांचे वेतन दिले असताना आॅपरेटसना मात्र ३५०० रुपये व ३८०० रुपये वेतन दिले जाते. तेही वेळेत मिळत नाही. त्यामुळे वैतागलेल्या डाटा आॅपरेटसनी मागील महिन्यात बेमुदत कामबंद आंदोलन केले होते. त्यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी व कंपनीच्या प्रतिनिधींनी मागण्या मान्य करण्याचे आश्वासन दिल्याने बंद मागे घेण्यात आला. मात्र, प्रत्यक्षात मागण्यांबाबत काहीच कार्यवाही झाली नाही. दि.१२ पासून बेमुदत कामबंद आंदोलन राहील तर १७ ते १९ नोव्हेंबर दरम्यान पंचायत समितीसमोर ठिय्या आंदोलन केले जाईल. बुधवार दि.१९ रोजी पंचायत समिती परिसरात स्वच्छता मोहीम राबवली जाणार असल्याचे संघटनेतर्फे सांगण्यात आले. दरम्यान आज काही ग्रामपंचायतीमध्ये डेटा आॅपरेटर कार्यरत होते असे समन्वयक बैकर यांनी सांगितले. (प्रतिनिधी)