नदीत कोसळलेल्या कंटेनरचा चालक अजून बेपत्ता
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 17, 2019 13:58 IST2019-07-17T13:55:29+5:302019-07-17T13:58:16+5:30
मंगळवारी रात्री संगमेश्वर येथील शास्त्री पुलावरून नदीत कोसळलेल्या ट्रकच्या चालकाचा शोध बुधवारीही सुरूच आहे. या गाडीत आणखी कोणी होते का, याची माहितीही अजून उपलब्ध झालेली नाही.

नदीत कोसळलेल्या कंटेनरचा चालक अजून बेपत्ता
देवरुख (रत्नागिरी) - मंगळवारी रात्री संगमेश्वर येथील शास्त्री पुलावरून नदीत कोसळलेल्या ट्रकच्या चालकाचा शोध बुधवारीही सुरूच आहे. या गाडीत आणखी कोणी होते का, याची माहितीही अजून उपलब्ध झालेली नाही.
बेपत्ता चालकाचा शोध घेण्यासाठी देवरुखच्या राजू काकडे हेल्प अॅकॅडमीचे सदस्य जयवंत वाईरकर, नंदकिशोर (अण्णा) बेर्डे, सिद्धू वेल्हाळ, विशाल तळेकर , दीपक गेल्ये, दिलीप गुरव, बाळू आंबवकर, राजु वनकुद्रे, मुकुंद वाजे, विनायक लिंबूकर हे सदस्य विशेष मेहेनत घेत आहेत.
सदरचा कंटेनरचा राजस्थानचा असून, राजेश ललाणी आसे मालकाचे नाव आहे. मात्र अजून त्यांच्या कार्यालयाशी संपर्क झाला नसल्याने गाडीत अजून कोणी आहे का, याची माहिती समजलेली नाही.