कोकणातील पर्यटन वाढीसाठी राज्य शासनाचे नवे धोरण
By Admin | Updated: January 5, 2016 00:20 IST2016-01-05T00:20:42+5:302016-01-05T00:20:42+5:30
ग्रामीण पर्यटन विकास : ग्रामपंचायतींकडून जिल्हाधिकाऱ्यांना प्रस्ताव पाठवण्यास प्रारंभ

कोकणातील पर्यटन वाढीसाठी राज्य शासनाचे नवे धोरण
मुंबई : चीनमधील आर्थिक मंदीच्या बातम्या बाहेर आल्यामुळे शेअर बाजारांत घबराट पसरली असून, मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्स ५३७.५५ अंकांनी घसरून २६ हजार अंकांच्या खाली आला आहे. सेन्सेक्सची ही तीन महिन्यांतील सर्वात मोठी घसरण ठरली आहे.
चीनमधील मंदीबरोबरच इतरही काही घटकांचा परिणाम बाजारावर झाल्याचे सूत्रांनी सांगितले. पश्चिम आशियातील राजकीय संकट आणि भारतातील वस्तू उत्पादन क्षेत्रातील घसरण यांचा त्यामध्ये प्रामुख्याने समावेश आहे. भारताचे वस्तू उत्पादन क्षेत्र डिसेंबरमध्ये घसरून २८ महिन्यांच्या नीचांकावर गेले आहे. चीनचे कारखाना उत्पादन सलग पाचव्या महिन्यात घसरल्याचे एका खाजगी सर्वेक्षणात आढळून आले आहे. याशिवाय रुपयाच्या घसरणीचाही बाजारावर परिणाम झाला. आशियाई बाजार आज मोठ्या सुटीनंतर उघडले. त्यांना चीनमधील मंदीचा फटका बसला. शांघाय कंपोजिट सकाळी उघडताच तब्बल ७ टक्क्यांनी घसरला. त्यामुळे बाजारातील व्यवहार बंद करण्याची नामुष्की आली.
३0 कंपन्यांचा बीएसई सेन्सेक्स सकाळपासूनच नकारात्मक टापूत राहिला. सत्राच्या अखेरीस ५३७.५५ अंकांची अथवा २.0५ टक्क्यांची घसरण नोंदवून तो २५,६२३.३५ अंकांवर बंद झाला. २२ सप्टेंबरनंतरचा हा सर्वात कमजोर बंद राहिला आहे. गेल्या दोन सत्रांत सेन्सेक्सने २0१ अंकांची वाढ मिळविली होती.
राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी १७१.९0 अंकांनी अथवा २.१६ टक्क्यांनी घसरून ७,७९१.३0 अंकांवर बंद झाला. १ सप्टेंबर रोजी निफ्टीने सर्वात मोठी एकदिवसीय घसरण नोंदविली होती. त्या दिवशी निफ्टी १८५.४५ अंकांनी घसरला होता.
सेन्सेक्समध्ये समाविष्ट असलेल्या ३0 पैकी २७ कंपन्यांचे समभाग घसरले. व्यापक बाजारांतही विक्रीचा दबाव राहिला. मिडकॅप १.२0 टक्क्याने, तर स्मॉल कॅप १.११ टक्क्याने घसरला. टाटाचा समभाग सर्वाधिक ६.१0 टक्क्यांनी घसरला. त्याखालोखाल भारती एअरटेल, अदाणी पोर्टस्, भेल, एचडीएफससी, एसबीआय, आयसीआयसीआय बँक, एल अँड टी, लुपीन, गेल, अॅक्सिस बँक, सन फार्मा यांचे समभाग घसरले.