वारी लालपरीतून उलगडला एसटीचा इतिहास
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 21, 2019 14:33 IST2019-06-21T14:32:36+5:302019-06-21T14:33:50+5:30
राज्याची लोकवाहिनी असलेल्या एसटीने मागील काही वर्षात अमुलाग्र बदल केले आहेत. एसटीने एक नवीन रुप परिधान केले आहे. या नव्या युगाच्या आधुनिक लालपरीच्या प्रगतीची गाथा सांगणारे ह्यवारी लालपरीचीह्ण हे अनोखे फिरते प्रदर्शन आयोजित करण्यात आले आहे. हे प्रदर्शन रत्नागिरीत दाखल झाले असून, त्याचे उद्घाटन गुरूवारी करण्यात आले. या प्रदर्शनाद्वारे ३० बेडफर्ड बसेसपासून ते शिवशाहीपर्यंतचा प्रवास दाखविण्यात आला आहे.

वारी लालपरीतून उलगडला एसटीचा इतिहास
रत्नागिरी : राज्याची लोकवाहिनी असलेल्या एसटीने मागील काही वर्षात अमुलाग्र बदल केले आहेत. एसटीने एक नवीन रुप परिधान केले आहे. या नव्या युगाच्या आधुनिक लालपरीच्या प्रगतीची गाथा सांगणारे ह्यवारी लालपरीचीह्ण हे अनोखे फिरते प्रदर्शन आयोजित करण्यात आले आहे. हे प्रदर्शन रत्नागिरीत दाखल झाले असून, त्याचे उद्घाटन गुरूवारी करण्यात आले. या प्रदर्शनाद्वारे ३० बेडफर्ड बसेसपासून ते शिवशाहीपर्यंतचा प्रवास दाखविण्यात आला आहे.
महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ आणि बस फॉर अस फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने वारी लालपरीची हे फिरते प्रदर्शन आयोजित केले आहे. रत्नागिरीतील रहाटागर येथील बसस्थानकात गुरुवारी कामगार अधिकारी प्रवीण पाटील, प्रभारी विभाग नियंत्रक सतीश बोगरे, यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी वाहतूक अधीक्षक सतीशकुमार खाडे, आगार व्यवस्थापक अजय मोरे, सहाय्यक वाहतूक अधिकारी अनंत जाधव, स्थानकप्रमुख तांदळे, आगार व्यवस्थापक सागर गाडे, वाहतूक नियंत्रक रमेश केळकर, वरिष्ठ लिपिक श्रीपाद कुशे उपस्थित होते.
अहमदनगर-पुणे मार्गावर १ जून १९४८ रोजी पहिली बस धावली. लाकडी बॉडी असलेल्या ३०बेडफर्ड बसेस घेऊन महामंडळाचा प्रवास सुरु झाला. कालांतराने महामंडळाने अनेक बदल करत एसटीच्या सुविधा वाढविल्या. लाकडी ऐवजी आता अल्युमिनियम बॉडीच्या बस आल्या. कुशन असलेल्या सीट वापरण्यास सुरुवात झाली. १९५६पासून रातराणी सेवा सुरु करण्यात आली. निळ्या रंगाच्या बस आता लाल झाल्या आहेत. महामंडळात आज १५ हजारपेक्षा जास्त बसेस आहेत.
ह्यवारी लालपरीचीह्ण उपक्रमात एसटी गाड्यांच्या बांधणीची माहिती मॉडेल आणि छायाचित्रांमधून देण्यात आली असल्याची माहिती फाऊंडेशनचे रोहित धेंडे यांनी दिली. रत्नागिरीतून हे फिरते प्रदर्शन २१ रोजी कणकवली आणि २२ रोजी मालवणमध्ये जाणार आहे.