चिपळुणात एस.टी.बसची सेवा ठप्प

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 17, 2017 17:20 IST2017-10-17T17:14:50+5:302017-10-17T17:20:08+5:30

वेतनवाढ व सातव्या वेतन आयोगासह अन्य मागण्यांबाबत एस. टी. कर्मचाºयांनी सोमवारी मध्यरात्रीपासून संप पुकारला आहे. यामध्ये चिपळूण आगारातील ६५० कर्मचारी सहभागी झाले असून, रोजच्या ३८० बस फेऱ्या बंद आहेत.

ST bus service in Chhipunya jam | चिपळुणात एस.टी.बसची सेवा ठप्प

एस. टी. कर्मचारी संपमध्ये चिपळूण आगारातील ६५० कर्मचारी सहभागी झाले असून, रोजच्या ३८० बस फेऱ्या बंद आहेत.

ठळक मुद्देएस. टी. महामंडळाला ९ ते १० लाख रुपयांचे नुकसान ऐन दिवाळीच्या सणात संप असल्यामुळे प्रवाशांचे हाल चिपळूण आगारात उभ्या बसच्या रांगा चिपळूण आगारातील ६५० कर्मचारी संपात सहभागी

चिपळूण , दि. १७ :  वेतनवाढ व सातव्या वेतन आयोगासह अन्य मागण्यांबाबत एस. टी. कर्मचाऱ्यानी सोमवारी मध्यरात्रीपासून संप पुकारला आहे. यामध्ये चिपळूण आगारातील ६५० कर्मचारी सहभागी झाले असून, रोजच्या ३८० बस फेऱ्या बंद आहेत.

मंगळवारी एकही गाडी रस्त्यावरुन धावलेली नाही. त्यामुळे एस. टी. महामंडळाला ९ ते १० लाख रुपयांचे नुकसान सहन करावे लागणार असून, यामध्ये महाराष्ट्र एस. टी. कामगार संघटना, इंटक संघटनेचे सर्व कर्मचारी व पदाधिकारी सहभागी झाले आहेत.


सोमवारी मध्यरात्रीपासून राज्यभरात एस. टी. महामंडळाच्या कर्मचाऱ्यांनी विविध मागण्यांसाठी संप पुकारला आहे. ऐन दिवाळीच्या सणात एस. टी.चा संप असल्यामुळे प्रवाशांचे हाल झाले आहेत. येथील मध्यवर्ती बसस्थानक, शिवाजीनगर बसस्थानक, जुना बसस्थानक या ठिकाणी प्रवाशांचा शुकशुकाट होता. चिपळूण आगारात उभ्या असलेल्या बसच्या रांगा दिसत होत्या.


काही ठिकाणी तुरळक प्रमाणात प्रवासी दिसत होते. या संपामध्ये महाराष्ट्र एस. टी. कामगार सेना, बहुजन राज्य परिवहन कर्मचारी संघटना सहभागी झाल्या नव्हत्या. चिपळूण आगारातील ६५० कर्मचारी संपात सहभागी झाले असून, रोजच्या ३८० बस फेऱ्या बंद आहेत. त्यामुळे एस. टी. महामंडळाला ९ ते १० लाख रुपयांचे नुकसान सहन करावे लागणार आहे. आज एकही गाडी धावली नाही.

 

Web Title: ST bus service in Chhipunya jam

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.