शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
2
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
3
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
4
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
5
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
6
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
7
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
8
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
9
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
10
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
11
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
12
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
13
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
14
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
15
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
16
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
17
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
18
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
19
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
20
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
Daily Top 2Weekly Top 5

रत्नागिरीत मनसेमध्ये फूट; भाजप, शिंदेसेनेत कार्यकर्त्यांनी केला प्रवेश 

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 28, 2024 18:05 IST

रत्नागिरी : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेत अंतर्गत सुरू असलेल्या धुसफुसीला कंटाळून रत्नागिरीतील मनसेच्या पदाधिकाऱ्यांसह कार्यकर्त्यांनी पक्षाला साेडचिठ्ठी देऊन अन्य पक्षात ...

रत्नागिरी : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेत अंतर्गत सुरू असलेल्या धुसफुसीला कंटाळून रत्नागिरीतीलमनसेच्या पदाधिकाऱ्यांसह कार्यकर्त्यांनी पक्षाला साेडचिठ्ठी देऊन अन्य पक्षात जाण्याचा पर्याय स्वीकारला आहे. काही पदाधिकाऱ्यांनी भाजपची वाट धरली आहे तर काहींनी शिंदेसेनेत प्रवेश केला आहे. त्यामुळे रत्नागिरी शहरातील मनसेत फूट पडल्याचे समाेर आले आहे.मनसेचे उपजिल्हाध्यक्ष रुपेश सावंत, उपशहर अध्यक्ष जितेंद्र जाधव, माजी शहराध्यक्ष सतीश राणे यांनी आपल्या सहकाऱ्यांसह भाजपमध्ये जाण्याचा निर्णय घेतला. त्यांच्यासाेबत सारिका शर्मा, माधवी गुरव, स्मिता गावडे, मोहिनी झगडे, नीलम जाधव, राजश्री सावंत, शीतल राणे, सोनाली केसरकर आदींसह कार्यकर्त्यांनी भाजपात प्रवेश केला.

भाजपच्या सभासद नोंदणी अभियान कार्यक्रमात हा पक्षप्रवेश पार पडला. आमदार रवींद्र चव्हाण, जिल्हाध्यक्ष राजेश सावंत, तालुकाध्यक्ष विवेक सुर्वे, दादा दळी, माजी आमदार डॉ. विनय नातू यांनी प्रवेशकर्त्यांचे स्वागत केले.त्याचबराेबर उद्योग व मराठी भाषा मंत्री उदय सामंत यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून मनसेचे अनिरुद्ध उर्फ छोटू खामकर, अजिंक्य केसरकर, अनिल पारकर, मिलिंद पाटील, साहिल वीर, अनंत शिंदे, सौरभ गायकवाड, सुनील पारकर, अमोल साळवी, संजय आग्रे, ओंकार सीनकर यांच्यासह पदाधिकाऱ्यांनी शिंदेसेनेत जाहीर प्रवेश केला. या पक्षप्रवेशावेळी उद्याेजक दीपक पवार, शहरप्रमुख बिपीन बंदरकर उपस्थित हाेते.

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीPoliticsराजकारणMNSमनसेBJPभाजपाEknath Shindeएकनाथ शिंदेShiv Senaशिवसेना