शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! RBI कडून पेटीएमचा बँकिंग परवाना कायमचा रद्द; युजर्सवर काय परिणाम होणार...
2
इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांना कर्करोग! खुद्द स्वतःच केला धक्कादायक खुलासा; आता कशी आहे तब्येत?
3
आप फुटली, भाजपाची ताकद वाढली! राज्यसभेत आता कोणत्या पक्षाचे किती खासदार?
4
'आप'ला भगदाड, खासदारांचा मोठा गट फुटला! अरविंद केजरीवाल म्हणाले, "भाजपाने पुन्हा..."
5
नेपाळमध्ये भारतीय भाविकांच्या बसला अपघात; २१ जण जखमी, ६ वर्षांच्या चिमुरडीसह एका महिलेचा मृत्यू
6
तरुणीला 'हाय' केले अन् वाद पेटला; लग्नातील वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात, एकाचा मृत्यू ८ जण जखमी, विकासकाविरुद्ध गुन्हा 
7
Latest Marathi News LIVE Updates: आम आदमी पक्षाला मोठा धक्का; राज्यसभेचे ७ खासदार फुटले, भाजपात प्रवेश करणार
8
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमारांना हटवण्याची मागणी; ७३ खासदारांचे सभापतींना पत्र
9
९०% मार्क्स, आयआरएससोबत वडिलांची ओळख अन् लक्झरी लाईफचं वेड; हुशार राहुल मीणा गुन्हेगार कसा झाला?
10
Raghav Chadha: राघव चड्ढा, हरभजनसिंग भाजपात! आम आदमी पार्टीत उभी फूट, राज्यसभेच्या १० पैकी ७ खासदारांचा पक्षाला 'राम-राम'
11
Raghav Chadha : राघव चड्ढांनी २१ दिवसांपूर्वीच दिले होते 'आप'मधील फुटीचे संकेत; भाकीत ठरलं खरं
12
“रिक्षा-टॅक्सी, ओला-उबेर, रॅपिडो चालकांनी मराठीत संवाद साधलाच पाहिजे”: मंत्री प्रताप सरनाईक
13
एकदम फिट दिसणाऱ्यांना का येतोय हार्ट अटॅक? डॉक्टरांनी सांगितलं 'ते' खरं कारण
14
'नरक' म्हणणाऱ्या डोनाल्ड ट्रम्प यांना चीनचे भारताचा झेंडा पोस्ट करत उत्तर; 'शब्द विरून जातात, पण...'
15
LPG Subsidy : तुमच्या सिलिंडरचं अनुदान खात्यात जमा होतंय का? घरबसल्या स्टेटस तपासण्याची सोपी पद्धत
16
दमदार इंजिनसह BMW ने भारतात लॉन्च केली सर्वात स्वस्त बाईक, जाणून घ्या किंमत अन् फीचर्स...
17
इन्स्टाग्राम युजर्सना मोठा धक्का! रंगीत फोटो झाले काळे-पांढरे; मिनिटांत करा दुरुस्त, फॉलो करा या सोप्या स्टेप्स
18
"मी त्याच्याशीच लग्न करणार...", बिग बॉस विजेती तन्वी कोलतेने केला खुलासा; प्रेमाबद्दल म्हणाली...
19
राजकारणात येण्यापूर्वी काय करायचे राघव चड्ढा; आपने ग्लॅमरस मोहरा गमावला... 
20
सावधान! फळ आणि भाज्या खाल्ल्याने वाढतोय कॅन्सरचा धोका? नव्या रिसर्चने सर्वच हादरले
Daily Top 2Weekly Top 5

प्रलंबित प्रकरणांबाबत विशेष मोहीम

By admin | Updated: July 25, 2015 01:13 IST

अधिकाऱ्यांचा उपक्रम : धर्मादाय आयुक्तांचा विशेष कार्यक्रम, लाभ घेण्याचे आवाहन

रत्नागिरी : धर्मादाय आयुक्त कार्यालयाकडे महाराष्ट्र सार्वजनिक न्यास नोंदणी अधिनियम १९५० नुसार नोंद होणाऱ्या संस्थांची संख्या प्रचंड आहे. जिल्ह्यात या कायद्यान्वये सुमारे ७ हजारांहून अधिक न्यास नोंद आहेत. यामध्ये सार्वजनिक मंदिरे, उत्सव मंडळे, सार्वजनिक वाचनालये, शैक्षणिक संस्था, चर्च व इतर धर्मादाय न्यासांचा समावेश होतो.यामधील कायदेशीर बाबींच्या अज्ञानामुळे विश्वस्तांना एकदा न्यास नोंदणी झाल्यानंतर बदल नोंद करणेविषयी पुरेशी माहिती नसल्याचे दिसून येते. त्यामुळे विश्वस्त हे बदल अर्ज स्थावर, जंगम मालमत्ता नोंदीकरिता अर्ज किंवा घटना व नियमावली दुरुस्ती अर्ज कार्यालयात दाखल केल्यानंतर त्यातील कागदपत्रांची योग्य पूर्तता करण्याबाबत अनभिज्ञ असतात. कार्यालयातील अपुऱ्या मनुष्यबळामुळे या सर्व प्रकरणांचा पाठपुरावा करणे शक्य होत नाही. या सर्व बाबींचा विचार करुन धर्मादाय आयुक्त, महाराष्ट्र राज्य, मुंबई यांच्या आदेशानुसार सार्वजनिक न्यास नोंदणी कार्यालय, रत्नागिरी, विभाग रत्नागिरी या कार्यालयात प्रलंबित असणारी प्रकरणे निकाली काढण्याच्या दृष्टीने एक विशेष मोहीम राबवण्याचे निश्चित करण्यात आले आहे.दि. २४ आॅगस्ट ते ५ सप्टेंबर २0१५ पर्यंत विशेष मोहीम कालावधी राहणार आहे. या मोहिमेंतर्गत कार्यालयात दाखल असणारी अवादग्रस्त प्रलंबित प्रकरणे निकाली काढण्याविषयी कार्यवाही करण्यात येणार आहे. त्यासंबंधी विश्वस्तांनी स्वयंस्फूर्तीने पुढाकार घेऊन सार्वजनिक न्यास नोंदणी कार्यालय, रत्नागिरी विभाग, रत्नागिरी, सुरभी अपार्टमेंट, दुसरा मजला, एस. व्ही. रोड, मारुती मंदिर, रत्नागिरी येथे संपर्क साधून प्रकरणाची सद्यस्थिती व आवश्यक कागदपत्रांच्या पूर्ततेविषयी लवकरात लवकर माहिती घेऊन सभा इतिवृत्त रजिस्टर, नोटीस रजिस्टर व इतर कागदपत्र सादर करावीत. दीर्घकाळापासून प्रलंबित असणारी प्रकरणे या विशेष मोहिमेमध्ये निकाली काढावीत, असे अधीक्षक सार्वजनिक न्यास नोंदणी कार्यालय, रत्नागिरी विभागातर्फे कळवण्यात आले आहे. याबाबत सर्व संबंधितांनी त्याचा लाभ घ्यावा, असे आवाहन धर्मादाय आयुक्त कार्यालयातर्फे करण्यात आल्यामुळे समाधान व्यक्त करण्यात येत आहे. (प्रतिनिधी)