साैंदळ येथे मातीचा भराव टाकावा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 23, 2021 04:34 IST2021-04-23T04:34:16+5:302021-04-23T04:34:16+5:30
राजापूर : गतवर्षी पावसाळ्यात ओणी, अणुस्कुरा मार्गावर सौंदळ रेल्वेस्थानकापासून काही अंतरावर पुराचे पाणी मोठ्याप्रमाणावर साचून त्या मार्गावरील संपूर्ण ...

साैंदळ येथे मातीचा भराव टाकावा
राजापूर :
गतवर्षी पावसाळ्यात ओणी, अणुस्कुरा मार्गावर सौंदळ रेल्वेस्थानकापासून काही अंतरावर पुराचे पाणी मोठ्याप्रमाणावर साचून त्या मार्गावरील संपूर्ण वाहतूक दीर्घकाळ बंद पडल्या हाेत्या. दरम्यान, सौंदळमधील त्या खोलगट भागात मातीचा भराव टाकून त्याची उंची वाढविणे आवश्यक असून शासनाने त्यादृष्टीने प्रयत्न करावेत, अशी मागणी आता वाढू लागली आहे.
सौंदळमधील रेल्वेस्टेशनपासून काही अंतरावर असलेला हा भाग खोलगट आहे. गेले दोन वर्षे झालेल्या अतिवृष्टीत या मार्गावर पुराचा वेढा पडला होता. गतवर्षी तर दोन दिवस मार्गावरील पुराचे पाणी न ओसरल्याने पूर्व परिसराकडील वाहतूक बंद होती. या मार्गावरील काही भाग खोलगट असल्याने तोच भाग पाण्याखाली असतो आणि वाहतूक बंद पडते. यावर्षी ९८ टक्के पाऊस पडेल, असा अंदाज यापूर्वी काही तज्ज्ञांनी वर्तविला आहे. तालुक्यात पूर्व परिसरात जोरदार वृष्टी होत असते. तालुक्याच्या अन्य भागांच्या तुलनेत या परिसरात पडणाऱ्या पावसाचे प्रमाण सर्वाधिक असते. त्यामुळे यावर्षीही अतिवृष्टीनंतर सौंदळमध्ये पाणी साचून वाहतुकीला व्यत्यय येण्याचा धोका कायम आहे, ही अडचण लक्षात घेऊन संबंधित सार्वजनिक बांधकाम विभागाने सौंदळ मार्गावर ज्या खोलगट भागात मोठ्याप्रमाणावर पुराचे पाणी साचून वाहतुकीला व्यत्यय येतो, तो भाग मातीचा भराव टाकून उंच करावा व रस्त्याची उंची वाढवावी, त्यासाठी प्रयत्न करावेत, अशी मागणी करण्यात येत आहे.