शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

"...तर उद्धव ठाकरे यांच्यावर FIR का दाखल होत नाही? त्यांना आत का टाकत नाही?"; रामदास कदम यांचा सवाल

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 19, 2024 10:15 IST

...मग उद्धव ठाकरे यांच्यावर एफआयआर का दाखल होत नाही? त्यांना आत का टाकत नाही, याचे गणित मला कळत नाही? असा सवाल शिवसेना शिंदे गटाचे नते रामदास कदम यांनी केला आहे.

उद्धव ठाकरे यांचा तोल आता एवढा खाली गेला आहे की, ते काहीही बडबडत आहेत. ते पंतप्रधानांना वाटेल ते बोलतायत, अमित शहांना वाटेल ते बोलतायत, मुख्यमंत्र्यांनाही वाटेल ते बोलतायत. मला एक कळत नाही, ज्यावेळेला नारायण राणे यांनी उद्धव ठाकरे यांच्यासंदर्भात वक्तव्य केले होते की, मी असतो तर कानाखाली मारली असती. त्यांना जेवणावरून उचलून आत  टाकले होते. मग उद्धव ठाकरे यांच्यावर एफआयआर का दाखल होत नाही? त्यांना आत का टाकत नाही, याचे गणित मला कळत नाही? असा सवाल शिवसेना शिंदे गटाचे नते रामदास कदम यांनी केला आहे. ते रत्नागिरीत पत्रकारांसोबत बोलत होते.

कदम म्हणाले, "ते (उद्धव ठाकरे) मुख्यमंत्र्यांनाच बूट चाटायला जातो, हा अमुक चाटतो, तमुक चाटतो. इतक्या खालच्या पातळीवरती जो माणूस जाऊन बोलतोय, त्यांचा तोल गेलेले आहे. राज्याच्या मुख्यमंत्र्यांवर बोलणे, म्हणजे हा राज्याचा अवमान आहे, महाराष्ट्र जनतेचा अवमान आहे. हे काही बिहार नाही ना? हा महाराष्ट्र आहे, सुसंस्कृत महाराष्ट्र आहे." ...बाळासाहेबांची स्टाईल मारायला जात आहेत -कदम पुढे म्हणाले, "उद्धव ठाकरे बाळासाहेबांची स्टाईल मारायला जात आहेत. आता मी बघितले की, हातामध्ये रुद्राक्ष बांधलेत काय, जणू काही मी बाळासाहेब आहेत? अरे बाळासाहेबांच्या नखाचीही आपल्याला सर येणार नाही. कुठे बाळासाहेब आणि कुठे तुम्ही आहात? बाळासाहेब शब्दाला पक्के होते, तुम्ही तर बाळासाहेबांच्या विचाराशी बेईमानी करत आहात."

आपण काय बोलतोय याचे भाण ठेवायला हवे सर्वांनी -"एकंदा संपूर्ण रणधुमाळी बघितली, तर उद्धव ठाकरेंचा तोल गेलेला आपल्याला बघायला मिळतो. वाटेल ते बडबडायचे, वाटेल ते आरोप करायचे, गुजरातच्या बाबतीमध्ये अधिक बोलायचे, अमित शहांवर बोलायचे, मुख्यमंत्र्यांवर बोलायचे. मग देवा भाऊ काय? जॉकेटवाला भाऊ काय? दाढीवाला भाऊ काय? तुम्हाला शोधत का हे? मग तुम्हाला कडका भाऊ म्हटले तर चालेल का कुणी? तुमच्या मुलाला लफडेवाला भाऊ म्हटले तर चालेल का कुणी? आपण काय बोलतोय याचे भाण ठेवायला हवे सर्वांनी. हे अशोभनीय आहे, असं म्हणेन मी. खरेतर याच्यावरती गुन्हा दाखल व्हायला हवा होता. त्यांना जेलमध्ये टाकायला हवे होता, असे माझे प्रामाणिक मत आहे." असेही रामदास कदम यांनी म्हटले आहे.

टॅग्स :Ramdas Kadamरामदास कदमUddhav Thackerayउद्धव ठाकरेShiv Senaशिवसेना