शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
2
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
3
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
4
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
5
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
6
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
7
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
8
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
9
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
10
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
11
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
12
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
13
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
14
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
15
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
16
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
17
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
18
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
19
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
20
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
Daily Top 2Weekly Top 5

Crime News in Ratnagiri: माशाच्या उलटीची तस्करी, खेड पाेलिसांनी तिघांना रंगेहाथ पकडले

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 17, 2023 12:05 IST

पाेलिसांनी अटक केलेल्या तिघांची नावे ठेवली गाेपनीय

खेड : लुप्तप्राय प्रजातीच्या माशाच्या उलटीची (अंबरग्रीस) तस्करी करणाऱ्या खेड पाेलिसांनी तिघांना रंगेहाथ पकडले. ही कारवाई रविवारी (१५ जानेवारी) राेजी सायंकाळी खेडमधील भरणे नाका येथे करण्यात आली. या कारवाईत पाेलिसांनी दाेन दुचाकीही ताब्यात घेतल्या आहेत. मात्र, पाेलिसांनी अटक केलेले हे तिघे परजिल्ह्यातील असून, या तिघांची नावे गाेपनीय ठेवली आहेत.लुप्तप्राय प्रजातीच्या माशाची उलटी (अंबरग्रीस) ची विक्री करण्यासाठी काही जण येणार आहेत, अशी गाेपनीय माहिती पाेलिसांना मिळाली हाेती. त्यानंतर खेड पोलिस उपनिरीक्षक सुजीत सोनवणे यांनी पोलिस अधीक्षक धनंजय कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली, खवटीचे वनरक्षक रानबा बंबर्गेकर यांच्यासह खेड पोलिसांचे एक पथक तयार केले.

या पथकाने महामार्गावरील भरणे नाका येथील साई रिसॉर्टच्या जवळ रविवारी सायंकाळी सापळा रचला. काही वेळाने या ठिकाणी तीन व्यक्ती संशयितरीत्या दोन दुचाकीवरून जात असताना या पथकाने पाहिले. त्यांना थांबवून त्यांची झडती घेतली असता त्यांच्याकडील एका पिशवीत लुप्तप्राय प्रजातीच्या माशाची उलटी (अंबरग्रीस) मिळाली.पाेलिसांनी अटक केलेल्या तिघांवर वन्यजीव (संरक्षण) अधिनियम १९७२ चे कलम २(१६), ३९, ४०(२), ४४(१), ४८(अ) (१), ४९, ४९ (ब), ५१ व ५२ प्रमाणे खेड पोलिस स्थानकात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. या गुन्ह्यामधील अन्य सहभागी व्यक्तींचा शोध पाेलिसांकडून सुरू आहे.

अत्तर, सुगंधित उत्पादनात वापरकाही दुर्मीळ माशांच्या शरीरातून निघालेला अंबरग्रीस (उलटी) हे औषधी तसेच अत्तर किंवा सुगंधित उत्पादनात वापरतात. त्यापासून तयार केलेले अत्तर लाखोंच्या किंमतीने विकले जाते. अत्तरात उलटीचा वापर हा स्थिरीकरण द्रव्य म्हणून वापरतात. या उलटीचा वापर करून तयार करण्यात आलेले अत्तर कपड्यावर किंवा शरीरावर मारल्यानंतर ते बराच काळ टिकून राहते.

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस