यूपीएससी परीक्षेत चिपळुणातील सिद्धार्थ जैन झळकला
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 26, 2025 18:37 IST2025-04-26T18:35:02+5:302025-04-26T18:37:59+5:30
चिपळूण : शहरातील महाराणी कलेक्शनचे पारसमल जैन यांचा सुपुत्र सिद्धार्थ पारसमल जैन याने यूपीएससी परीक्षेत ३९७ वी रँक मिळविली ...

यूपीएससी परीक्षेत चिपळुणातील सिद्धार्थ जैन झळकला
चिपळूण : शहरातील महाराणी कलेक्शनचे पारसमल जैन यांचा सुपुत्र सिद्धार्थ पारसमल जैन याने यूपीएससी परीक्षेत ३९७ वी रँक मिळविली आहे. त्याने मिळविलेल्या या यशाबद्दल चिपळूण शहरातून त्याचे कौतुक करण्यात येत आहे.
सिद्धार्थ पारसमल जैन हा वालोपे येथील ख्रिस्त ज्योती कॉन्व्हेंट स्कूलचा माजी विद्यार्थी आहे. त्यानंतर नवकोकण एज्युकेशन सोसायटीच्या डीबीजे महाविद्यालयात त्याचे उच्च माध्यमिक शिक्षण झाले. यानंतर त्याने इंडियन मेरीटाइम युनिव्हर्सिटी, मुंबई येथून मरीन इंजिनिअरिंगची पदवी मिळवली. गेली तीन वर्षे तो दिल्ली येथे यूपीएससीचा अभ्यास करीत होता. २०२४ मध्ये झालेल्या यूपीएससी परीक्षेचा निकाल दोन दिवसांपूर्वी जाहीर झाला असून, यामध्ये ३९७ वी रँक मिळवत सिद्धार्थने यश मिळवले आहे.
सत्तर वर्षांपूर्वी आजाेबा चिपळुणात
सिद्धार्थचे आजोबा फत्तेलाल जैन हे ७० वर्षांपूर्वी राजस्थान राज्यातील मोखुंदा येथून चिपळूणमध्ये आले. युनायटेड इंग्लिश स्कूलचे ते १९६८ चे विद्यार्थी आहेत. येथेच ते स्थायिक झाले. सिद्धार्थचा मोठा भाऊ हितेश सीए आहे, तर धाकटी बहीण साक्षी वकील आहे.