रत्नागिरीत राष्ट्रवादीला धक्का, माजी जिल्हाध्यक्ष सुदेश मयेकर शिवसेनेत

By मनोज मुळ्ये | Updated: January 10, 2024 12:32 IST2024-01-10T12:32:00+5:302024-01-10T12:32:36+5:30

रत्नागिरी : राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी जिल्हाध्यक्ष सुदेश मयेकर यांनी बुधवारी शिवसेनेमध्ये प्रवेश केला. मंत्री उदय सामंत यांच्या निवासस्थानी झालेल्या ...

Shock to NCP in Ratnagiri, former district president Sudesh Mayekar joins Shiv Sena | रत्नागिरीत राष्ट्रवादीला धक्का, माजी जिल्हाध्यक्ष सुदेश मयेकर शिवसेनेत

रत्नागिरीत राष्ट्रवादीला धक्का, माजी जिल्हाध्यक्ष सुदेश मयेकर शिवसेनेत

रत्नागिरी : राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी जिल्हाध्यक्ष सुदेश मयेकर यांनी बुधवारी शिवसेनेमध्ये प्रवेश केला. मंत्री उदय सामंत यांच्या निवासस्थानी झालेल्या कार्यक्रमात उदय सामंत यांचे वडील रवींद्र सामंत आणि त्यांच्या मातोश्री स्वरुपा सामंत आणि उद्योजक किरण सामंत यांनी सुदेश मयेकर यांचे स्वागत केले. याप्रसंगी शिवसेना तालुकाप्रमुख बाबू म्हाप, शहराध्यक्ष बिपीन बंदरकर, महिला आघाडी जिल्हाध्यक्ष शिल्पा सुर्वे यांच्यासह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.

सुदेश मयेकर यांनी गेल्याच महिन्यात प्रकृती अस्वास्थ्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसच्या जिल्हाध्यक्ष पदाचा राजीनामा दिला होता. त्यानंतर मंत्री सामंत यांच्या मातोश्री स्वरुपा सामंत यांचा एक व्हिडिओ व्हायरल झाला. त्यात त्यांनी सुदेश मयेकर यांना उदय सामंत यांच्यासोबत येण्याची साद घातली. तू उदय आणि किरणचा जवळचा मित्र आहे. तू त्यांच्यासोबतच राहावेस, अशी साद त्यांनी घातली. त्यामुळे सुदेश मयेकर यांचा प्रवेश निश्चित मानला जात होता.

आज, बुधवारी मंत्री सामंत यांच्या पाली येथील निवासस्थानी त्यांनी शिवसेनेचा भगवा हाती घेतला. यावेळी रवींद्र तथा अण्णा सामंत, स्वरुपा सामंत, किरण सामंत, बाबू म्हाप, बिपीन बंदरकर यांच्यासह अनेक पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.

Web Title: Shock to NCP in Ratnagiri, former district president Sudesh Mayekar joins Shiv Sena