शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई इंडियन्सची लाजीरवाणी हार, शेवटच्या क्रमांकावर समाधान! रोहित शर्मा, नमन धीर यांचा संघर्ष व्यर्थ
2
"आता मराठीतही मेडिकल, इंजीनियरिंगचे शिक्षण घेणे शक्य होणार"! PM मोदींनी दिली आनंदाची बातमी
3
राहुल गांधींकडून वदवून घ्या की, स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल...; PM मोदींचं शरद पवारांना आव्हान
4
निकोलस पूरनने दोन खणखणीत सिक्स खेचले, अर्जुन तेंडुलकरने मैदान सोडले; नेमके काय घडले?
5
"ते गरीब-गरीब करत माळच जपायचे, मोदीने 25 कोटी लोकांना गरीबीतून बाहेर काढले"; पंतप्रधानांचा काँग्रेसवर हल्लाबोल 
6
मुलुंडमध्ये पैसे वाटपाच्या आरोपावरून तणाव; उद्धव सेना- भाजप कार्यकर्ते आमने-सामने
7
प्रचारादरम्यान कन्हैया कुमार यांच्यावर हल्ला, हार घालण्यासाठी आलेल्या तरुणाने लगावली थप्पड!
8
'हा आत्मा तुम्हाला सत्तेवरून खाली खेचल्याशिवाय राहणार नाही', शरद पवारांचा मोदींवर घणाघात
9
"...तर मोदी पंतप्रधान झालेच नसते", उद्धव ठाकरेंची भाजपावर सडकून टीका 
10
एका व्हिडीओने माझी वाट लावलीय! MI बाबतच्या विधानानंतर Rohit Sharma चा दुसरा Video Viral
11
'मी तुम्हाला विकसित भारत देऊन जाईन, ही माझी गॅरंटी', शिवतीर्थावर नरेंद्र मोदींचं मोठं विधान
12
निकोलस पूरन-लोकेश राहुल यांनी शतकी भागीदारी; मुंबईची हॅटट्रिक, पण LSG दोनशेपार 
13
मराठीला अभिजात भाषेचा दर्जा, संविधान, गडकिल्ले...राज ठाकरेंच्या PM मोदींकडे 'या' मागण्या
14
'उद्धव ठाकरेंनी तमाम हिंदू बांधवांनो म्हणणे सोडून दिले', देवेंद्र फडणवीसांची बोचरी टीका
15
PM मोदींच्या नेतृत्वात महाराष्ट्रासह देशाचा विकास झाला, अजित पवारांचा विरोधकांवर निशाणा
16
"उद्धवजी महाराष्ट्रात चालणार नाहीत तुमचे नखरे, कारण आमच्यासोबत आलेत राज ठाकरे", रामदास आठवलेंची कवितेतून टीका
17
गौतम गंभीर टीम इंडियाचा नवा कोच! द्रविडची रिप्लेसमेंट म्हणून BCCI प्रयत्नशील
18
शरीरातील बॅड कोलेस्टेरॉल कमी करण्यासाठी रामबाण आहे हळद आणि तुळस! असा करा वापर
19
Fact Check: पंतप्रधान मोदींच्या विजयाचा दावा करणारा राहुल गांधींचा 'तो' Video एडिटेड!
20
ममता बॅनर्जी आणि अभिषेक बॅनर्जी यांना जीवे मारण्याची धमकी!

रिफायनरीवरून शिवसेनेची घोषणाबाजी, पावसाळी अधिवेशनामध्ये रणशिंग फुंकले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 07, 2018 5:32 PM

नाणार प्रकल्पावरून शिवसेनेने नागपुरातील पावसाळी अधिवेशनामध्ये रणशिंग फुंकले असून, शुक्रवारी विधानभवनाच्या पायऱ्यांवर भाजपविरोधात निषेधाच्या घोषणा दिल्या. या आंदोलनात राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार भास्कर जाधव हेदेखील सामील झाले होते.

ठळक मुद्देरिफायनरीवरून शिवसेनेची घोषणाबाजीपावसाळी अधिवेशनामध्ये रणशिंग फुंकले

राजापूर : नाणार प्रकल्पावरून शिवसेनेने नागपुरातील पावसाळी अधिवेशनामध्ये रणशिंग फुंकले असून, शुक्रवारी विधानभवनाच्या पायऱ्यांवर भाजपविरोधात निषेधाच्या घोषणा दिल्या. या आंदोलनात राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार भास्कर जाधव हेदेखील सामील झाले होते.राज्य विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन नागपूर येथे सुरू झाले आहे. शिवसेनेच्या महाराष्ट्रातील आमदारांनी विधान भवनाच्या पायऱ्यांवर ठिय्या मारुन केंद्र व राज्य शासनाने लादलेल्या विनाशकारी रिफायनरी प्रकल्पाविरोधात निषेधाच्या घोषणा दिल्या.

शिवसेनेचे विधिमंडळातील मुख्य प्रतोद आमदार सुनील प्रभू, राजापूरचे आमदार राजन साळवी, आमदार भास्कर जाधव, वैभव नाईक, डॉ. सुजित मणचेकर, प्रकाश आंबिटकर, प्रताप सरनाईक, ज्ञानराज चौगुले, प्रकाश फाफरतेकर, तुकाराम काते, अजय चौधरी, सुरेश गोरे, तृप्ती सावंत व कोकणसह राज्यातील सेना आमदार या आंदोलनात सहभागी झाले होते.यानंतर सेना प्रतोद आमदार सुनील प्रभू व आमदार राजन साळवी यांनी कोकणच्या माथी प्रकल्प लादणाºया शासनाचा तीव्र शब्दात निषेध केला. शिवसेना सदैव जनतेच्या पाठीशी ठामपणे उभी ठाकली आहे. ह्यनाणार प्रकल्प रद्द होत नाही, तोवर आम्ही गप्प बसणार नाहीह्ण, ह्यशासनाची दडपशाही चालू देणार नाही, रिफायनरी प्रकल्प रद्द झालाच पाहिजेह्ण अशा शब्दात शिवसेनेच्या आमदारांनी मते मांडली.भास्कर जाधवही आलेशिवसेना आमदारांनी पुकारलेल्या या आंदोलनात राष्ट्रवादी काँग्रेसचे गुहागरचे आमदार भास्कर जाधवदेखील सहभागी झाले होते. भास्कर जाधव यांच्या सहभागामुळे भास्कर जाधव आणि शिवसेना याबाबत चर्चा रंगू लागली आहे.

टॅग्स :Nagpur Monsoon Session 2018नागपूर पावसाळी अधिवेशन २०१८Ratnagiriरत्नागिरीVidhan Bhavanविधान भवनnanar refinery projectनाणार प्रकल्प