रत्नागिरी : शिवसेना तालुकाप्रमुखांना राष्ट्रवादी आमदाराच्या पुतण्याची मारहाण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 13, 2018 15:28 IST2018-11-13T15:26:18+5:302018-11-13T15:28:19+5:30

खेड तालुक्यातील नातूनगर घागवाडी येथे शिवसेना गटप्रमुख संजय घाग यांच्याकडे गेलेल्या तालुकाप्रमुख भालचंद्र तथा राजा बेलोसे यांना किरकोळ कारणावरून आमदार संजय कदम यांच्या पुतण्याने सहकाऱ्यांसह शिवीगाळ करून मारहाण केल्याची घटना तालुक्यात घडली आहे. याप्रकरणी संग्राम कदम यांच्यासह पंचवीस ते तीस जणांवर खेड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

Shiv Sena Taluka's head beat NCP MLA's effacement | रत्नागिरी : शिवसेना तालुकाप्रमुखांना राष्ट्रवादी आमदाराच्या पुतण्याची मारहाण

रत्नागिरी : शिवसेना तालुकाप्रमुखांना राष्ट्रवादी आमदाराच्या पुतण्याची मारहाण

ठळक मुद्देशिवसेना तालुकाप्रमुखांना राष्ट्रवादी आमदाराच्या पुतण्याची मारहाणपंचवीस ते तीस जणांवर खेड पोलीस ठाण्यात गुन्हा

खेड : तालुक्यातील नातूनगर घागवाडी येथे शिवसेना गटप्रमुख संजय घाग यांच्याकडे गेलेल्या तालुकाप्रमुख भालचंद्र तथा राजा बेलोसे यांना किरकोळ कारणावरून आमदार संजय कदम यांच्या पुतण्याने सहकाऱ्यांसह शिवीगाळ करून मारहाण केल्याची घटना तालुक्यात घडली आहे. याप्रकरणी संग्राम कदम यांच्यासह पंचवीस ते तीस जणांवर खेड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

खेड पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शिवसेना तालुकाप्रमुख राजा बेलोसे यांनी सोमवारी पोलिस ठाण्यात या घटनेबाबत तक्रार दिली आहे. त्या तक्रारीत नमूद केल्याप्रमाणे, बेलोसे हे रविवारी रात्री दहा वाजण्याच्या सुमारास नातूनगर घागवाडी याठिकाणी शिवसेना गटप्रमुख संजय घाग यांच्या घरी जेवणासाठी गेले होते. त्यांची स्कॉर्पिओ गाडी रस्त्याच्या बाजूला उभी होती. यावेळी पाठीमागून आलेल्या ट्रकचा चालक सतत हॉर्न देऊ लागला. त्यावेळी बेलोसे यांनी दोनच मिनिटात गाडी पुढे घेतो असे सांगितले.

तसेच त्याला तुझ्याकडे पास आहे का? असे विचारले. याचा राग येऊन तेथील अजय बेलोसे यांनी राजा बेलोसे यांना गाडी बाजूला न घेतल्यास डंपर गाडीवर चढवेन अशी धमकी देऊन आमदार संजय कदम यांचा पुतण्या संग्राम कदम तसेच २० ते २५ जणांना त्याठिकाणी बोलावले.

यावेळी सर्वांनी राजा बेलोसे यांना शिवीगाळ, धक्काबुक्की व हाताने मारहाण करत ठार मारण्याची धमकी दिली. याप्रकरणी राजा बेलोसे यांनी पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे. या प्रकरणी खेड पोलीसांकडून अधिक तपास सुरू आहे.

Web Title: Shiv Sena Taluka's head beat NCP MLA's effacement

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.