शहरं
Join us  
Trending Stories
1
अमराठी वाहनचालकांसाठी मराठी संवाद अनिवार्य; प्रभावी अंमलबजावणीसाठी विशेष बैठक
2
Top Marathi News LIVE Updates: बारामती पोटनिवडणुकीसाठी आज मतदान; पश्चिम बंगाल, तामिळनाडूतही मतदारराजा देणार कौल
3
Gold Silver Price Today : बाजार उघडताच चांदीत ₹६,००० ची घसरण, सोनंही झालं स्वस्त; चेक करा तुमच्या शहरातील २४K, २२K, १८K चा भाव
4
१४ चौकार, ५ षटकार... लॉरा वूल्फार्टचा शतकी धमाका; स्मृती मानधानाच्या विश्वविक्रमाशी बरोबरी
5
Share Market: उघडताच जोरदार आपटला शेअर बाजार! Sensex ७०० अंकांनी खाली, 'या' शेअर्स मध्ये मोठी घसरण
6
Stray Dogs: भटक्या श्वानांच्या घरासाठी पालिकेला कोणी जागा देता का?
7
खळबळजनक! ३० वर्षीय अभिनेत्री घरात बेशुद्ध पडली अन् घेतला अखेरचा श्वास, कुटुंबाला मोठा धक्का
8
MBA नंतर २५ लाखांची नोकरी सोडून चालवू लागला ओला कार; ३ वर्षात ६.५० लाख कमाई, खरेच शक्य आहे?
9
'या' लोकांना दर महिन्याला ₹१०,००० पेन्शन देण्याचा विचार करतेय सरकार; कोणती आहे योजना, जाणून घ्या
10
इराण युद्धाची भारताने चुकवली किंमत, २५ लाख टन युरियाची दुप्पट दरात केली खरेदी; बाजारपेठेत खळबळ
11
महिला क्रिकेटरचा 'हनीट्रॅप' गेम! व्यावसायिकाला ६३ लाखांना लुटले, मुंबई पोलिसांनी श्रीनगरमधून उचलले
12
"रिद्धी खूप खूश झाली अन्..." राकेश बापटने सांगितली एक्स वाईफची कशी होती प्रतिक्रिया
13
ब्रेक फेल, नियंत्रण सुटले, भरधाव ट्रकची बोलेरोसह दोन वाहनांना धडक, ११ जण जिवंत जळाले   
14
IRS अधिकाऱ्याच्या मुलीवर अत्याचार आणि हत्या; हाय-टेक सुरक्षा भेदून घरात कसा घुसला आरोपी?
15
‘पंतप्रधान मोदींना लक्ष्य करणे म्हणजे थेट १४० कोटी भारतीयांचा अपमान’, एकनाथ शिंदेंची खर्गेंवर टीका
16
Success Story: ₹८००० ची नोकरी ते ₹२३,००० कोटींच्या साम्राज्यापर्यंत, स्कूल ड्रॉपआउट निखिल कामथ कसे बनले अब्जाधीश?
17
विशेष लेख: नॉनस्टॉप ७० तास गेमिंग! खाणं, झोपणं तिथेच!
18
आजचे राशीभविष्य - २३ एप्रिल २०२६, व्यापार - व्यवसायात लाभ होतील, नोकरीत वरिष्ठ खुश होतील
19
लेख: काँक्रीटच्या जंगलात चतकोर तरी मोकळी जागा ठेवाल का?
20
लेख: डोनाल्ड ट्रम्प यांना झुकवणाऱ्या होर्मुझ सामुद्रधुनीचे रहस्य!
Daily Top 2Weekly Top 5

शिवसेना संघटनेतच शिस्तीला हरताळ!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 30, 2015 22:43 IST

रत्नागिरी : नाचणे, गोळपमध्ये शिस्तीचा पंचनामा

रत्नागिरी : आदेशाला मान देणारे शिवसैनिक असे समीकरण बनलेले आहे. मात्र, गेल्या काही कालावधीत हे समीकरण बदलते आहे असे म्हणण्याजोगी स्थिती आहे. रत्नागिरीतील नाचणे ग्रामपंचायत उपसरपंच निवडणुकीत पक्षांतर्गत वादातूनच सेनेच्या अधिकृत उमेदवाराविरोधात मतदान करून पक्षादेश झुगारण्यात आला. तर गोळप ग्रामपंचायतीत शिवसेना सदस्यांमधील अंतर्गत राजकारणामुळे येणारी सत्ता गेली. पक्षशिस्तीला हरताळ फासणाऱ्यांवर कारवाईचा बडगा उगारण्याची घोषणा होऊनही अद्याप काहीच कृती न झाल्याने घोषणा हवेत विरल्याच्या चर्चेला उधाण आले आहे.रत्नागिरी तालुक्यातील नाचणे ग्रामपंचायत सरपंच व उपसरपंच पदाची निवडणूक पंधरा दिवसांपूर्वीच झाली. नाचणे ग्रामपंचायत निवडणुकीत शिवसेनेचे सर्व १७ सदस्य विजयी झाले होते. त्यामुळे सरपंच व उपसरपंचपदासाठी शिवसेनेतच जोरदार रस्सीखेच सुरू होती. त्यावेळी सेनेच्या वरिष्ठांकडून सरपंचपदासाठी आदेश देत जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष जयसिंग घोसाळे यांच्या पत्नी जयाली घोसाळे यांचे नाव निश्चित झाले होते. त्या बिनविरोध निवडून आल्या. मात्र, उपसरपंचपदासाठी भेय्या भोंगले हे सेनेतील नवीन गटाचे उमेदवार पक्षाने अधिकृत केले होते. मात्र, जयसिंग घोसाळे व भेय्या भोंगले यांचे राजकीय मतभेद असल्याने ग्रामपंचायत कारभारात पटणार नाही म्हणून भोंगले यांच्या नावाला विरोध झाला. त्यामुळे कपिल सुपल यांनी उपसरपंचपदासाठी अर्ज भरला. शिवसेनेच्या सदस्यांनी भोंगले यांना मतदान करण्याचा पक्षादेश असतानाही तो धुडकावला व कपिल सुपल उपसरपंच म्हणून निवडून आले.याप्रकाराने शिवसेनेत खळबळ माजली. सेनेतील शिस्तीचा, पक्षादेशाचा पंचनामाच झाला. सेनेत आता शिस्त पाळली नाही तरी चालते, कारवाई होत नाही, असा समज बळावत चालला आहे. कारवाईची घोषणा सेना पदाधिकाऱ्यांनी केली परंतु कारवाई झालीच नाही. त्यामुळे सेनेतील पदाधिकारीही मवाळ बनले असल्याची चर्चा शिवसैनिकांमध्येच सुरू झाली आहे. (प्रतिनिधी)कारवाईची केवळ घोषणाच...संघटनात्मक पातळीवरील सेनेतील शिस्त ही महत्वाची मानली जात असतानाही तालुक्यात जुन्या नवीन शिवसैनिकांमध्ये अजूनही खऱ्या अर्थाने मनोमिलन झाले नसल्याने मतभेदांची चर्चा नेहमीच सुरू असते. तालुक्यातील गोळप ग्रामपंचायतीत सेनेला सत्ता संपादन करण्याएवढे संख्याबळ उभे करता आले असते. मात्र, सरपंचपदावरून वाद काही मिटले नाहीत व सेनेची हाती येणारी सत्ता गेली. सेनेचा हा अनपेक्षित पराभव सर्वच कार्यकर्त्यांच्या जिव्हारी लागला.