रत्नागिरी : बारा दिवसांपूर्वीच लग्न होऊन घरात आलेल्या सुनेने घरातील सोन्याचे दागिने आणि रोख रक्कम घेऊन पोबारा केला. ही घटना गुरुवारी सकाळी रत्नागिरी तालुक्यातील पाली-मोहितेवाडी येथे घडली.याबाबत तिचे सासरे दत्ताराम राजाराम मोहिते (वय ५९, रा. मोहितेवाडी-पाली, रत्नागिरी) यांनी रत्नागिरी ग्रामीण पोलिस स्थानकात फिर्याद दिली आहे. त्यांच्या मुलाचे २८ जून २०२५ रोजी लग्न झाले होते. त्यानंतर तिने सासरे दत्ताराम मोहिते यांचा विश्वास संपादन केला.मात्र, गुरुवारी सकाळी ११:५० वाजण्याच्या सुमारास बेडरुममधील कॉटखाली ठेवलेल्या पत्र्याच्या कुलूप बंद पेटीतील ३ लाख २ हजार रुपयांचे सोन्याचे दागिने आणि रोख रक्कम ६० हजार असा एकूण ३ लाख ६२ हजारांचा ऐवज लांबवला.
लग्न करून आली अन् दागिने पैसे घेऊन पळाली; रत्नागिरीतील घटना
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 12, 2025 12:56 IST