सत्तर टक्क्यांहून अधिक निधी फक्त रस्त्यावरच खर्च
By Admin | Updated: July 24, 2014 23:28 IST2014-07-24T23:18:05+5:302014-07-24T23:28:47+5:30
जिल्ह्यातील पाच विधानसभा मतदारसंघाच्या आमदारांनी २०१३-१४ या वर्षात आपल्या विकास कामांपैकी सर्वाधिक खर्च रस्ता दुरूस्ती व डांबरीकरण याच्यावर केला आहे

सत्तर टक्क्यांहून अधिक निधी फक्त रस्त्यावरच खर्च
रत्नागिरी : जिल्ह्यातील पाच विधानसभा मतदारसंघाच्या आमदारांनी २०१३-१४ या वर्षात आपल्या विकास कामांपैकी सर्वाधिक खर्च रस्ता दुरूस्ती व डांबरीकरण याच्यावर केला आहे. अर्थात तरीही जिल्ह्यातील रस्त्यांची स्थिती दयनीयच आहे. सर्व आमदारांचा मिळून सत्तर टक्क्यांहून अधिक निधी फक्त रस्त्यांच्या कामावरच खर्च झाला आहे. पाखाडी, गटारे, संरक्षक भिंती, एखाददुसरे समाजमंदिर, सभागृह आदी कामे वगळता आरोग्य, शिक्षण यासारख्या प्रमुख गोष्टी मात्र दुर्लक्षित दिसतात. आमदारांचा स्थानिक विकास कार्यक्रमांतर्गत प्रत्येक विधानसभा मतदारसंघासाठी २ कोटी रूपयांची तरतूद असून हा निधी जिल्हा नियोजन समितीकडून वितरीत केला जातो. २०१३ - १४ या आर्थिक वर्षात जिल्ह्यातील पाचही आमदारांनी सुचविलेल्या कामांमध्ये सर्वाधिक महत्त्व रस्ता दुरूस्ती आणि पाखाडी यांना दिलेले आहे. पाच आमदारांच्या दहा कोटीपैकी ७ कोटी ३२ लाखा ७७ हजार इतकी रक्कम आमदारांनी २४९ रस्ते, पाखाडी अशाच कामांसाठी खर्च केली आहे. कोणत्याही भागाच्या विकासात दळणवळणाचे महत्त्व अधिक असल्याने रस्त्यांच्या कामांना प्राधान्य देण्यात आले आहे. मात्र तरीही जिल्ह्यातील असंख्य रस्त्यांची आताच दुरवस्था झालेली दिसून येते. जिल्ह्यात पाण्याची समस्या मोठ्या प्रमाणावर आहे. त्यामुळे सर्वच आमदारांनी पाणीपुरवठ्यावर भर दिला आहे. उदय सामंत यांनी सर्वाधिक कामे (११) सुचविली असून त्यासाठी प्रशासकीय मान्यतेची रक्कम २९.७३ लाख इतकी आहे. त्याखालोखाल भास्कर जाधव यांनी सात कामे (१६.३१ लाख) सुचविलेली आहेत. आमदार सदानंद चव्हाण यांनीही पाणीपुरवठ्यावर भर देत १२ विंधनविहीरीची कामे सुचविली असून त्यासाठी ७.४५ लाख रूपयांची प्रशासकीय मान्यता मिळालेली आहे. राजन साळवी यांच्याही ३ कामांसाठी ३.७८ लाख रूपयांची प्रशासकीय मान्यता मिळालेली आहे. सुर्यकांत दळवी यांनी मात्र पाणीपुरवठ्यासाठी एकही रूपया दिलेला नाही. याव्यतिरिक्त समाजमंदिरे, सभागृहे, पिकअपशेड आदी कामांचा समावेश आहे. अर्थात आरोग्य, शिक्षण, क्रीडा यासारख्या महत्त्वाच्या विषयांसाठी निधीची तरतूद करण्याकडे बहुतेक आमदारांनी दुर्लक्ष केले आहे. पाचपैकी तीनच आमदारांनी क्रीडा क्षेत्रासाठी निधी दिला आहे. (प्रतिनिधी) उदय सामंत - रत्नागिरी एकूण कामे७१ पाणीपुरवठा २९.७३ (११) रस्ता, पाखाडी १३७.६३ (५२) संरक्षक भिंती २.०० (१) सांस्कृतिक रंगमंच १.४३ (१) क्रीडा साहित्य १.९८ (१) शिक्षण २.२९ (१)पिकअपशेड ६.६६ (२) एस. टी. प्रसाधनगृह १९.९९ (२) वैशिष्ट्यपूर्ण कामे ----- एकूण खर्च : १९९.७३ एकूण कामे९५पाणीपुरवठा३.७८ (३) रस्ता, पाखाडी १२३.५१ (८४)संरक्षक भिंती ५.५४ (३) सभागृह २.५० (१)क्रीडा २.०० (२) शिक्षण ---इतर०.९२ (२) शासकीय कार्यालयांना संगणक वैशिष्ट्यपूर्ण कामे -----एकूण खर्च २१२.८८ एकूण कामे ८२ पाणीपुरवठा ७.४५ (१२) रस्ता, पाखाडी १९०.६६ (६०) संरक्षक भिंती ११.९४ (५) समाजमंदिर व सभागृह ७.८५ (२) क्रीडा १.०० (१) शिक्षण ५.०० (१) पिकअपशेड १.४६ (१) एकूण खर्च २१२.८८ सदानंद चव्हाण - चिपळूण एकूण कामे९५पाणीपुरवठा३.७८ (३) रस्ता, पाखाडी १२३.५१ (८४)संरक्षक भिंती ५.५४ (३) सभागृह २.५० (१)क्रीडा २.०० (२) शिक्षण ---इतर०.९२ (२) शासकीय कार्यालयांना संगणक वैशिष्ट्यपूर्ण कामे -----एकूण खर्च २१२.८८ सुर्यकांत दळवी - दापोलीएकूण कामे२९ पाणीपुरवठा --- रस्ता, पाखाडी १२३.५१ (२०) संरक्षक भिंती ---- समाजमंदिर व सभागृह ३०.८० (७) क्रीडा --- शिक्षण --- पिकअपशेड२.९४ (२) एकूण खर्च१५९.११ भास्कर जाधव - गुहागर एकूण कामे ५४ पाणीपुरवठा १६.३१ (७) रस्ता, पाखाडी १५७.४६ (३३) संरक्षक भिंती१४.९० (३) समाजमंदिर व सभागृह २६.७० (८) क्रीडा --- शिक्षण--- पिकअपशेड १.३३ एकूण खर्च २०६.०३