शहरं
Join us  
Trending Stories
1
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
2
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
3
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
4
आता झाडे बोलणार, स्वतःची ओळखही सांगणार! सोलापुरातील शाळेचा अनोखा प्रयोग, नक्की काय आहे हा प्रकार?
5
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
6
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
7
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
8
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
9
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
10
Uber: उबर चालकांच्या उत्पन्नात वाढ; कंपनीकडून कमिशन कपात, भाडं वाढणार का?
11
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
12
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
13
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
14
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
15
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
16
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
17
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
18
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
19
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
20
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
Daily Top 2Weekly Top 5

लांजाजवळ अपघातात सात ठार

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 12, 2018 05:12 IST

मुंबई-गोवा महामार्गावर लांजाजवळ कुवे येथे अवघड वळणावर कार आणि खासगी आराम बस यांची धडक झाल्याने कारमधील सात जण ठार झाले तर चार जण जखमी झाले.

लांजा (जि. रत्नागिरी) : मुंबई-गोवा महामार्गावर लांजाजवळ कुवे येथे अवघड वळणावर कार आणि खासगी आराम बस यांची धडक झाल्याने कारमधील सात जण ठार झाले तर चार जण जखमी झाले. कारमधील सर्व जण दहिसर पूर्वमधून (मुंबई) कोंड्ये (ता. राजापूर) येथे आपल्या गावी गणेशोत्सवासाठी येत होते. मंगळवारी सकाळी साडे दहाच्या दरम्यान हा अपघात झाला.प्रियांका काशीराम उपळकर (२९), पंकज हेमंत घाणेकर (१९), भार्गवी हनुमंत माजळकर (६ महिने), तिचा भाऊ सार्थक (६), मानसी हनुमंत माजळकर (३0), राजेश बापू शिवगण (२६) तसेच मंगेश उपळकर (२६) अशी मृतांची नावे आहेत. मंगेश याचा उपचार सुरू असताना मृत्यू झाला.मुंबईच्या दहिसर पूर्व रावळपाडा भागात राहणारे उपळकर व माजळकर कुटुंबीय गणेशोत्सवासाठी आपल्या कोंड्ये या गावी कारने (एमएच ०२ / ए के ९९६३) मुंबईहून राजापूरकडेयेत होते. या कारमध्ये ११ जणहोते. त्या वेळी कुवे येथे एकाअवघड वळणावर समोरून आलेल्या एका खासगी आराम बसने (एमएच ०४ / एफआर ५५०८) कारला धडक दिली. दोन्ही गाड्यांची धडक इतकी जोरदार होती की, त्यात कारचा चक्काचूर झाला. त्यामुळे कारमध्ये काही जण अडकून पडले होते. लांजा आणि कुवे येथील तरुणांनी त्यांना बाहेर काढले.>जखमींवर कोल्हापूर, रत्नागिरीत उपचारया अपघातात लहू काशीराम उपळकर (१८), अंकुश काशीराम उपळकर (१८), हनुमंत शंकर माजळकर (३५), किरण तरळ (१८), आराम बसचा चालक नितीन शांताराम जाधव (३४, महाड पोलादपूर, रायगड) हे जखमी झाल्याने त्यांना कोल्हापूरला हलविण्यात आले. याखेरीज क्लीनर संदेश शंकर कांबळे (२१, खावडी, लांजा) हाही यात जखमी झाला असून, त्याच्यावर रत्नागिरीत उपचार सुरू आहेत.