शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
3
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
4
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
5
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
6
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
7
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
8
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
9
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
10
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
11
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
12
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
13
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
14
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
15
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
16
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
17
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
18
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
19
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
20
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
Daily Top 2Weekly Top 5

न्यायालयीन कोठडीतील संशयित गंभीर, वडिलांचा आरोप, गृहमंत्र्यांकडे धाव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 6, 2021 17:21 IST

Crimenews Ratnagiri Police- खेर्डी येथील वेश्या व्यवसाय प्रकरणातील संशयित आरोपी म्हणून पोक्सोअंतर्गत गुन्हा दाखल झालेला आणि सध्या न्यायालयीन कोठडीत असलेला अश्रफ हुसेन चौगुले याची प्रकृती गंभीर बनल्याचा आरोप त्याच्या वडिलांनी केला आहे. त्याची प्रकृती अधिक खालावत असून, त्याच्यावर योग्य उपचार होत नाहीत. पोलीस कोठडीत त्याला जबर मारहाण करण्यात आल्याचा आरोप त्याच्या वडिलांनी केला आहे. याबाबत त्याच्या वडिलांनी थेट गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याकडे दाद मागितली आहे.

ठळक मुद्देन्यायालयीन कोठडीतील संशयित गंभीरवडिलांचा थेट आरोप, गृहमंत्र्यांकडे घेतली धाव

चिपळूण : खेर्डी येथील वेश्या व्यवसाय प्रकरणातील संशयित आरोपी म्हणून पोक्सोअंतर्गत गुन्हा दाखल झालेला आणि सध्या न्यायालयीन कोठडीत असलेला अश्रफ हुसेन चौगुले याची प्रकृती गंभीर बनल्याचा आरोप त्याच्या वडिलांनी केला आहे. त्याची प्रकृती अधिक खालावत असून, त्याच्यावर योग्य उपचार होत नाहीत. पोलीस कोठडीत त्याला जबर मारहाण करण्यात आल्याचा आरोप त्याच्या वडिलांनी केला आहे. याबाबत त्याच्या वडिलांनी थेट गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याकडे दाद मागितली आहे.याबाबत संशयित आरोपी अश्रफ चौगुले यांचे वडील हुसेन हारून चौगुले यांनी राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांना तीन पानांचे पत्र पाठवून या प्रकरणातील माहिती दिली आहे. चिपळूण - खेर्डी येथील वेश्या व्यवसाय प्रकरणात अश्रफ याला चिपळूण पोलिसांनी २८ नोव्हेंबर २०२० रोजी अटक करून गुन्हा दाखल केला. त्यावेळी त्याची तब्बेत खणखणीत होती. त्याला कोणताही आजार नव्हता. त्याला या प्रकरणात ६ दिवसांची पोलीस कोठडी मिळाली आणि नंतर न्यायालयीन कोठडीत रवानगी झाली.१५ दिवसांनी त्याची तब्येत खालावली आणि त्याला प्रथम उलट्या होऊ लागल्या. त्याची भेट घेतली असता, त्याची प्रकृती खालावली होती. शौचावाटे प्रचंड रक्तस्त्राव होत असल्याचे आणि उलट्या होत असल्याचे त्याने सांगितले. याबाबत नायब तहसीलदार तानाजी शेजाळ यांना माहिती देऊन तत्काळ उपचार करण्याची विनंतीही केल्याचे त्यांनी म्हटले आहे.न्यायालयाच्या परवानगीने त्याच्यावर ६ फेब्रुवारी रोजी प्रथम कामथे रुग्णालयात नंतर १० फेब्रुवारी रोजी रत्नागिरी जिल्हा रुग्णालय आणि परत ११ फेब्रुवारी रोजी कामथे रुग्णालयात उपचार करण्यात आले. परंतु, त्याच्या आजाराची योग्य तपासणी झालीच नसल्याचे म्हटले आहे. अखेर प्रकृती गंभीर बनल्यानंतर मुंबईला हलविण्याचा सल्ला देण्यात आला.

त्याला मुंबई येथील सायन रुग्णालयात दाखल केले. त्याठिकाणी ८ दिवस उपचारही झाले. अश्रफ हा कोठडीतील आरोपी असल्याने त्याला जे. जे रुग्णालयामध्ये दाखल करण्याच्या सूचना देण्यात आल्या. दिनांक १ मार्च रोजी जे. जे. रुग्णालयामध्ये दाखल केले. परंतु, तो आरोपी असल्याने चक्क दाखल करण्यास नकार देण्यात आल्याचे हुसेन चौगुले यांनी म्हटले आहे.साहेब, मुलाला वाचवाहुसेन चौगुले यांनी गृहमंत्र्यांना आर्त साद घातली आहे. आमच्या कुटुंबातील तो एकमेव कमवता आहे. त्याच्यावरच आमचे सर्व कुटुंब अवलंबून आहे. त्याला एक अपंग मुलगाही असल्याचे म्हटले आहे. साहेब, माझ्या मुलाला वाचवा. किमान त्याच्यावर योग्य उपचार व्हावेत, अशी मागणी त्यांनी केली आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीRatnagiriरत्नागिरीPoliceपोलिसAnil Deshmukhअनिल देशमुख