संदीप जोयशीची खुल्या राष्ट्रीय ॲथलेटीक्स अजिंक्यपद स्पर्धेसाठी निवड
By मेहरून नाकाडे | Updated: September 20, 2023 14:29 IST2023-09-20T14:28:13+5:302023-09-20T14:29:17+5:30
संदीपने नुकत्याच मुंबई येथे झालेल्या राज्य ॲथलेटीक्स स्पर्धेत १५०० मीटर धावण्याच्या स्पर्धेत चमकदार कामगिरी केली होती.

संदीप जोयशीची खुल्या राष्ट्रीय ॲथलेटीक्स अजिंक्यपद स्पर्धेसाठी निवड
रत्नागिरी : रत्नागिरी जिल्हा ॲथलेटीक्स असोसिएशनचा धावपटू संदीप जोयशी याची खुल्या राष्ट्रीय ॲथलेटीक्स अजिंक्यपद स्पर्धेसाठी महाराष्ट्र संघात निवड झाली आहे.
संदीपने नुकत्याच मुंबई येथे झालेल्या राज्य ॲथलेटीक्स स्पर्धेत १५०० मीटर धावण्याच्या स्पर्धेत चमकदार कामगिरी केली होती. या कामगिरीच्या जोरावर त्याची दि.११ ते दि. १४ ऑक्टोबर अखेर जमशेदपूर (झारखंड) येथे होणाऱ्या राष्ट्रीय खुल्या ॲथलेटीक्स चॅम्पियनशिपसाठी महाराष्ट्र संघात निवड झाली आहे.
डेरवण येथील एसव्हीजेसीटी क्रीडा संकुल येथे प्रशिक्षक अविनाश पवार यांच्या मार्गदर्शनाखाली संदीप गेली काही वर्षे सराव करीत आहे. संदीप याच्या निवडीबद्दल रत्नागिरी जिल्हा ॲथलेटीक्स असोसिएशनचे अध्यक्ष बाळा कदम, क्रीडा संकुलाचे क्रीडा संचालक श्रीकांत पराडकर, सरचिटणीस संदीप तावडे आणि प्रशिक्षक अविनाश पवार यांनी अभिनंदन केले आहे.