कोव्हॅक्सिनचा दुसरा डोस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 31, 2021 04:23 IST2021-05-31T04:23:48+5:302021-05-31T04:23:48+5:30

२. राज्याची ऑक्सिजन उत्पादन क्षमता १२०० मेट्रिक टन आणि मागणी १७०० मेट्रिक टन अशी स्थिती दुसऱ्या कोरोना लाटेत ...

The second dose of covacin | कोव्हॅक्सिनचा दुसरा डोस

कोव्हॅक्सिनचा दुसरा डोस

२. राज्याची ऑक्सिजन उत्पादन क्षमता १२०० मेट्रिक टन आणि मागणी १७०० मेट्रिक टन अशी स्थिती दुसऱ्या कोरोना लाटेत निर्माण झाली. त्यामळे इतर ठिकाणांवरुन ऑक्सिजन आणावा लागला. अशी स्थिती यापुढे येणार नाही, याची खबरदारी घ्या. कोविडचा मुकाबला करताना अधिक सक्षम होण्याची आवश्यकता आहे, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी रत्नागिरीत २०० खाटांच्या समर्पित रुग्णालयाच्या ऑनलाईन लोकार्पण सोहळ्यात सांगितले.

३. रत्नागिरी जिल्ह्यात स्वॅब टेस्टिंग आणि कॉन्टॅक्ट ट्रेसिंगचे प्रमाण फार कमी आहे. ते वाढविण्यासाठी संपर्कात आलेल्यांच्या चाचणीसाठी वेळप्रसंगी पोलीस, तहसीलदार, गटविकास अधिकारी आदींची मदत घ्या, तरच बाधित निश्चित होऊन त्यांच्यावर उपचार होतील. संसर्ग रोखता येईल, अशा कडक सूचना आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी जिल्हा प्रशासनाला दिल्या आहेत. कोरोनाबाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालल्याने चिंता व्यक्त केली जात आहे.

Web Title: The second dose of covacin

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.