खेड (जि. रत्नागिरी) : तालुक्यातील लोटे येथील भगवान कोकरे महाराज याच्यावर अल्पवयीन मुलीच्या विनयभंगाची दुसरी तक्रार दाखल झाली आहे. या तक्रारीनंतर खेडपोलिसांनी भगवान कोकरे महाराज, त्याचे सहकारी शिक्षक प्रीतेश कदम आणि पीडित मुलीच्या आत्यावर गुन्हा दाखल केला आहे.ही घटना दि. १६ ऑक्टोबर २०२४ ते १८ जून २०२५ या कालावधीत घडली. पीडित मुलीच्या तक्रारीनुसार कोकरे महाराजाकडून तिचा वारंवार विनयभंग करण्यात आला. या प्रकरणात प्रीतेश कदम आणि आपल्या आत्याचा सहभाग असल्याचे तिने नमूद केले आहे. खेड पोलिसांनी या तिघांविरुद्ध गुन्हा नोंदविला आहे.पहिल्या प्रकरणात न्यायालयीन कोठडीविनयभंगाच्या पहिल्या गुन्ह्यात कोकरे महाराज आणि प्रीतेश कदम यांना दोन दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली होती. ही कोठडी संपल्यानंतर गुरुवारी त्यांना न्यायालयासमोर हजर करण्यात आले. आता त्यांना दि. ३० ऑक्टोबरपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे.
Web Summary : Bhagwan Kokare Maharaj, already in judicial custody for molestation, faces a second charge. The new complaint, filed in Khed, alleges repeated molestation of a minor girl between October 2024 and June 2025. Police have also booked his associate, teacher Pritesh Kadam, and the victim's aunt for involvement.
Web Summary : भगवान कोकरे महाराज, जो पहले से ही छेड़छाड़ के आरोप में न्यायिक हिरासत में हैं, पर दूसरा आरोप लगा है। खेड़ में दर्ज नई शिकायत में अक्टूबर 2024 और जून 2025 के बीच एक नाबालिग लड़की के बार-बार छेड़छाड़ का आरोप है। पुलिस ने उनके सहयोगी, शिक्षक प्रीतेश कदम और पीड़िता की चाची को भी शामिल होने के लिए बुक किया है।