विरोधकांच्या पोटात धडकी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 3, 2016 21:42 IST2016-07-03T21:42:45+5:302016-07-03T21:42:45+5:30

भास्कर जाधव : चिखली येथे राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ता शिबिर

The screw in the stomach of the opposition | विरोधकांच्या पोटात धडकी

विरोधकांच्या पोटात धडकी

गुहागर : जिल्ह्यात फूट पडली होती, याचा फायदा विरोधकांनी घेतला. आता एकत्र आलेला, एकसंघ झालेला राष्ट्रवादी पक्ष बघून विरोधकांच्या पोटात धडकी बसल्याशिवाय राहणार नाही, जिल्हा परिषदेबरोबरच पुढच्या वेळी खासदारही राष्ट्रवादी काँग्रेसचा असेल, असा विश्वास आमदार भास्कर जाधव यांनी व्यक्त केला.
चिखली येथील ओंकार मंगल कार्यालयात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्ता शिबिर सांगता समारंभात ते बोलत होते. जाधव म्हणाले, २० वर्षांपूर्वी सेनेची लाट होती. पण, त्याआधी काँग्रेसची लाट होती हे विसरू नये. चांगले काम केले तर बदल होऊ शकतो. गुहागर व दापोलीमधून अशा प्रकारे घडवून आणलेला बदल तुमच्यासमोर आहे. माणसं बदलून पक्षाचं काम वाढलं नसतं. पुन्हा एकदा जुन्या कार्यकर्त्यांना साद घाला. त्यांच्या मनात विश्वास निर्माण केलात, तर सर्वत्र सत्ता येऊ शकते. दिलेला शब्द पाळणं, ही राजकारणातील माझी ताकद आहे. मागील निवडणुकीत पक्ष एकसंघ नव्हता, म्हणून खासदार आपल्या पक्षाचा होऊ शकला नाही. तानाजीराव चोरगे, बाबाजी जाधव, शेखर निकम हे सर्व माझ्याबरोबर असतील तर कोणालाही शह देऊ शकतो. रमेश कदमांची समजूत काढणं आपल्या समजुतीपलीकडचे असल्याचे ते म्हणाले.
सचिव विनायक मुळे यांनी प्रास्ताविक केले. जिल्हा उपाध्यक्ष पद्माकर आरेकर, जिल्हाध्यक्ष शेखर निकम, प्रांतिक सदस्य बाबाजी जाधव, विक्रांत जाधव, सिकंदर जसनाईक, नेत्रा ठाकूर, चित्रा ठाकूर, जयदेव मोरे यांनी मार्गदर्शन केले. यावेळी विलास वाघे, सुनील जाधव, उपस्थित होते. (प्रतिनिधी)
सुरक्षित मतदारसंघ : युवकांना प्राधान्य
जिल्ह्यात गुहागर हा सुरक्षित मतदारसंघ म्हणून पाहिला जात आहे. पक्षाध्यक्ष शरद पवार यांनी विद्यार्थी संघटनेच्या कामाचे कौतुक करुन आगामी काळात ७० टक्के युवकांना प्राधान्य द्या, असे सांगितले आहे. जिल्ह्यात पक्षाच्या सर्वाधिक आमदारांनी निवडणूक लढवावी, असे सुचित केले. बाप्पा सावंत यांनीही भाषणातून याला दुजोरा दिला. मात्र, यावर जाधव यांनी कोणतेही वक्तव्य केले नाही.

Web Title: The screw in the stomach of the opposition

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.