शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांना खूश करण्यासाठी युक्रेनचा नवा डाव; डोनबासचा काही भाग आता होणार 'डोनीलँड'?
2
इराणनं अमेरिकेची नाकाबंदी तोडली, नाकाखालून घेऊन गेला ३४ टँकर्स; ९० कोटी डॉलर्सचं तेल 'होर्मुज'बाहेर! असा दिला चकमा
3
कॅप्टन रियान परागची चाल अन् गोलंदाजांची कमाल! RR नं पंतच्या LSG ला घरच्या मैदानात दिला पराभवाचा दणका
4
उकाड्याने हैराण पुण्यात अचानक पावसाचा वर्षाव; स्वारगेट, शास्त्री रोड परिसरात मध्यम सरी
5
LSG vs RR :अवघ्या ११ धावांत पंतसह तिघांच्या पदरी भोपळा! बडोनीनं स्वतःच्या पायावर मारून घेतली कुऱ्हाड
6
खर्गे मोदींना म्हणाले 'दहशतवादी'; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, २४ तासांत मागवलं उत्तर
7
एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...?
8
Vaibhav Suryavanshi Fastest 500 : छोट्याखानी खेळीत महारेकॉर्ड! वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास
9
मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यात मोठा निकाल; पुराव्याअभावी ४ आरोपींची निर्दोष मुक्तता!
10
LSG vs RR : शमीचा जलवा! यशस्वीपाठोपाठ ध्रुव जुरेल ठरला झिरो! लगेच संजीव गोएंकांनी काढला फोटो
11
प्रियकर मुलीच्या खोलीतून निघाला; चिडलेल्या बापाने पोटच्या १७ वर्षीय मुलीला संपवले
12
इराण-अमेरिका युद्धाचा फटका आता थेट 'फॅमिली प्लॅनिंग'ला! ३० टक्क्यांपर्यंत वाढू शकतात कंडोम्सचे भाव
13
उल्हासनगर महापालिकेत 'डम्पिंग'वरून रणकंदन; भाजप नगरसेवकांचे ठिय्या आंदोलन
14
कल्याणमध्ये ७० हजार रुपयांचा सायबर क्राईम : हेल्पलाईन तक्रार करुन दाद नाही
15
पाकिस्तानमधून इराणमध्ये दहशतवादी घुसले! रास्क सीमेवर मोठी चकमक; १२ दहशतवादी ठार
16
ममता बॅनर्जींचा हस्तक्षेप लोकशाहीसाठी धोकादायक! आयपॅक-ईडी कारवाईवरून सर्वोच्च न्यायालयाचे ताशेरे
17
WhatsApp वापरता? मग 'हे' सेटिंग्ज माहीतच हवेत; ९०% लोक अजूनही वापरतच नाहीत!
18
Top Marathi News LIVE Updates: बुलढाणा: उपसरपंचाच्या कुटुंबावर हल्ला; पत्नीला विष पाजल्याचा आरोप
19
टी-२० इंटरनॅशनलमध्ये या विक्रमाची केवळ बरोबरीच होऊ शकते; मोडणं अशक्य! केवळ २ गोलंदाजांनाच जमलाय हा अद्भुत चमत्कार
20
हवाई प्रवास स्वस्त होणार? विमानाच्या इंधनात इथेनॉल मिश्रणास केंद्राची मंजुरी...
Daily Top 2Weekly Top 5

शहरी बसमधून पडून शालेय विद्यार्थिनी जखमी

By admin | Updated: July 6, 2014 01:05 IST

जिल्हा रुग्णालयात दाखल

रत्नागिरी : क्षमतेपेक्षा जास्त विद्यार्थ्यांची वाहतूक करणाऱ्या शहरी बसमधून शालेय विद्यार्थिनी फेकली गेल्याची घटना रत्नागिरी जिल्हा रुग्णालयाजवळ घडली. सुदैवाने विद्यार्थिनी सुरक्षित असली तरी चोवीस तासांकरिता निरीक्षणासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. चालक अविनाश सरोदे हे आपल्या ताब्यातील शहर वाहतुकीची बस (एमएच-१२-युए-९६३८) घेवून आयडीयल हायस्कूल येथून मिरकरवाडाकडे शालेय विद्यार्थी घेऊन जात होते. विद्यार्थीसंख्या जास्त असल्याने नववीमधल्या काही मुली दरवाजातून लोंबकळत प्रवास करीत होत्या. जिल्हा शासकीय रुग्णालयाजवळील डॉ. आंबेडकर पुतळ्याला वळसा मारत असताना शाईस्ता इक्बाल दाऊद पेजे ही नववीतील मुलगी गतीमुळे फेकली गेली. तिच्यासोबतच्या अन्य दोन मुलींना वाहक पटेल यांनी पकडल्याने त्या बचावल्या. शाहिस्ता बसमधून फेकली गेल्याचे पाहून रिक्षा व्यावसायिकांनी आरडाओरड करत बस थांबविण्याचा प्रयत्न केला व शाहिस्ताला उचलून जिल्हा रुग्णालयात दाखल केले. बसमधील विद्यार्थ्यांनीही ओरड करताच चालक सरोदे यांनी नगर परिषदेजवळ बस थांबवली. शाहिस्ताला मोठ्या प्रमाणात मुका मार लागला आहे. तिचे पालक रुग्णालयात येईपर्यंत चालक - वाहक रुग्णालयात थांबून होते. बसमधून प्रवास करणाऱ्या मुलांना अनेकदा लोंबकळत प्रवास करावा लागतो, असे तिने सांगितले. चालक सरोदे यांनी ‘लोकमत’ला सांगितले की, मागील दरवाजात लटकणाऱ्या मुलांना गाडी सुटण्यापूर्वी बसमधून उतरवून पुढील दाराने चढण्यास सांगितले होते. मात्र गाडी सोडताना काही मुली धावत येऊन पुन्हा दरवाजात लटकत राहिल्या. मुलांनीही या गोष्टीला दुजोरा दिला. विद्यार्थी वाहतुकीसाठी एसटीकडून जादा बसेस पुरवल्या जाणे आवश्यक असल्याचे अनेक ठिकाणी निदर्शनास येत आहे. (प्रतिनिधी)