शहरं
Join us  
Trending Stories
1
विधान परिषदेच्या एका जागेसाठी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये ४ नावांवर चर्चा, विक्रम काकडे यांचं नाव आघाडीवर
2
'चंद्रकांता' फेम भरत कपूर यांचं निधन, वयाच्या ८६ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास; अभिनयाचा चार दशकांचा प्रवास थांबला
3
"न कळत सारं घडलं..." लाजिरवाण्या पराभवानंतर अक्षर पटेल झाला 'कावरा बावरा', म्हणे...
4
वेगळ्या घोषणेची गरज नाही, भारत आधीपासूनच हिंदूराष्ट्र - सरसंघचालक मोहन भागवत
5
Bhuvneshwar Kumar : स्विंगचा किंग भुवीची पॉवरप्लेमध्ये कमाल! एकाच डावात दोन खास विक्रमांना गवसणी
6
मुंबई सीएसएमटीवरून सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा घसरला, सुदैवाने सर्व प्रवासी सुरक्षित!
7
चंद्रपुरातील किडनी विक्री प्रकरणात रविंद्रपाल सिंग यांना जामीन नाहीच, हायकोर्टाचा निर्णय; सखोल तपासासाठी अर्ज फेटाळला
8
एमआयडीसीतील फॅक्टरींमध्ये अनेक कामगारांचे पोलिस व्हेरिफिकेशनच नाही; ना कागदपत्र, ना कुणाची नोंद
9
Virat Kohli New Record : किंग कोहलीचा 'विराट' पराक्रम! IPL मध्ये ९००० धावांसह रचला नवा विक्रम
10
२६ कामगारांचा बळी घेणाऱ्या एसबीएल कंपनीतील पाच पदाधिकाऱ्यांना दणका; उच्च न्यायालयाचा अटकपूर्व जामिनास नकार
11
यवतमाळ जिल्हा बँकेचे मुदतवाढ मिळालेले संचालक मंडळ अखेर बरखास्त; उपनिबंधकांकडे कारभार, संचालक मंडळाच्या मनसुब्यावर पाणी 
12
विदर्भातील सहा शहरांमध्ये ‘सन’ताप कायम, आणखी २४ तास उष्णतेची लाट; मात्र अर्धे जिल्हे अवकाळीच्या सावटात
13
DC vs RCB : हिशोब चुकता! दिल्ली कॅपिटल्सच्या घरच्या मैदानात रॉयल चॅलेंजर्सनं ३९ चेंडूत संपवली मॅच
14
Top Marathi News Live: मुंबई सीएसएमटीवरुन सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा पुणे स्थानकात घसरला
15
"५१ अंशांच्या उन्हातही काही होणार नाही, माझ्या गाडीत AC चालत नाही"; ज्योतिरादित्य शिंदेंनी सांगितला उष्णतेच्या लाटेपासून बचावाचा देशी उपाय!
16
महाराज आला रे! मोठ्या धक्क्यातून सावरण्यासाठी Mumbai Indians नं खेळली 'ही' चाल
17
१ मे पासून LPG गॅसचे नियम बदलणार? सिलिंडर हवा असेल तर 'DAC' कोड द्यावा लागणार; पाहा नवे बदल
18
DC vs RCB: ८ धावांत ६ विकेट्स! भुवी-हेजलवूडमध्ये विकेट घेण्याची स्पर्धा; दिल्लीकरांसाठी भयावह स्वप्न
19
भसाभस वाढतंय वीज बिल... एसी सोबत पंखा किती फायदेशीर? फक्त AC च्या 'या' आकड्याकडे लक्ष द्या; सरकारनं दिला खास 'मंत्र'
20
वॉशिंग मशीन लावून झाल्यानंतर ४० मिनिटांनी अंघोळ करायचे लक्षात ठेवा...; नाहीतर ठरू शकते जीवघेणे!
Daily Top 2Weekly Top 5

सव्वालाख तिजोरीत

By admin | Updated: November 9, 2015 23:41 IST

वाहतूक पोलीस : ९५३ वाहनचालकांवर कारवाई

चिपळूण : शहरात वाहतूक पोलिसांनी आपली ठोस कारवाई सुरुच ठेवली असून, गेल्या काही दिवसात ९५३ जणांकडून १ लाख ३८ हजार ३०० रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे. गणेशोत्सव, शिमगोत्सव, दिवाळी या काळात चिपळूण बाजारपेठेत शिवाजी चौक ते बाजारपेठ दरम्यान वाहतुकीची कोंडी होत असते. एरव्हीही या भागात सकाळी ११ ते दुपारी १ वाजेपर्यंत वाहतुकीची कोंडी होत असते. परंतु, वाहतूक पोलीस चौकी कार्यरत झाल्यापासून या भागातील वाहतूक कोंडीवर नियंत्रण मिळवण्यात यश आले आहे.ऐन दिवाळी सणाच्या काळातही या भागात वाहतूक सुरळीत सुरु आहे. वाहतूक पोलिसांनी पार्किंगची योग्य सुविधा उपलब्ध केल्याने रिक्षाचालक व दुचाकीस्वारांना शिस्त लागली आहे. सातत्याने पोलीस फिरत असल्याने रिक्षा चालकही शिस्तीने गाड्या हाकतात. पोलीस उपनिरीक्षक राकेशसिंग परदेशी यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार शांताराम साप्ते, रवींद्र शिंदे, गणपत झोरे, सुनील साळुंखे, सुभाष भुवड, प्रदीप भंडारी यांची टिम संपूर्ण शहरात कार्यरत असते. बेदरकारपणे वाहन चालवणे, दारु पिऊन वाहन चालवणे, अवैध प्रवासी वाहतूक, क्षमतेपेक्षा जास्त प्रवासी भरणे यावर पोलीस सातत्याने लक्ष ठेवून असतात. दोषी आढळल्यास ठोस कारवाई करण्यात येते. त्यामुळे वाहतुकीला शिस्त लागली आहे. उपविभागीय पोलीस अधिकारी महादेव गावडे, पोलीस निरीक्षक प्रमोद मकेश्वर यांच्या मार्गदर्शनामुळे वाहतूक सुरळीत होण्यास मदत झाली आहे. गेल्या काही दिवसात दारु पिऊन वाहन चालवणाऱ्या ६ जणांवर गुन्हे दाखल झाले आहेत. चिपळूण तालुक्यात अवैध प्रवासी वाहतूक ११, धूमस्टाईल वाहन चालवणे १७, पीयुसी नसणे १, विनापरवाना वाहन चालवणे २, सीटबेल्ट नसणे ११, वन-वेतून किंवा विरुध्द दिशेने वाहन चालवणे २२४, चुकीच्या ठिकाणी पार्किंग करणे २२३ जणांवर कारवाई करुन १ लाख ३८ हजार ३०० रुपयांचा दंड आकारण्यात आला आहे. (प्रतिनिधी)वाहतुकीला बसला आळा.९५३ जणांकडून १ लाख ३८ हजार ३०० रुपयांचा दंड केला वसूल. चुकीच्या ठिकाणी पार्किंग व वन-वे तून प्रवास करणाऱ्या ४५० जणांवर कारवाई.रिक्षाचालकांसह अवजड वाहतूक करणाऱ्या वाहनचालकांना लागली शिस्त.प्रकारांत वाढचिपळूण परिसरात बेदरकारपणे वाहने चालवण्याचे प्रकार वाढले आहेत. त्यामुळे अशा वाहनचालकांवर कारवाईची मागणी होत होती.