सावर्डे नांदगावमधील महिलेची हत्या, दागिनेही नेले चोरून

By संदीप बांद्रे | Updated: August 28, 2024 15:33 IST2024-08-28T15:32:59+5:302024-08-28T15:33:42+5:30

सावर्डे-नांदगाव येथे ६० वर्षीय महिलेच्या डोक्यात सिलेंडर घालून अज्ञाताने हत्या केल्याची घटना मंगळवारी सायंकाळी ६.३० वाजता उघडकीस आली.

Sawarde killed a woman in Nandgaon, also stole jewelry | सावर्डे नांदगावमधील महिलेची हत्या, दागिनेही नेले चोरून

सावर्डे नांदगावमधील महिलेची हत्या, दागिनेही नेले चोरून

चिपळूण : सावर्डे-नांदगाव येथे ६० वर्षीय महिलेच्या डोक्यात सिलेंडर घालून अज्ञाताने हत्या केल्याची घटना मंगळवारी सायंकाळी ६.३० वाजता उघडकीस आली. संबंधित महिलेच्या अंगावरील साडी घरापासून काही अंतरावर मिळाली, तर त्यांचे दागिनेही चोरीला गेल्याने खळबळ उडाली आहे. 

सुनिता परशुराम पवार (नांदगाव खुर्द, गोसावीवाडी) असे या महिलेचे नाव आहे. ही महिला घरी एकटीच होती. दहीहंडीच्या उत्सवानिमित्त पती आणि वाडीतील नागरिक बाहेर गेले होते. त्याच दरम्यान अज्ञात इसमाने महिलेच्या घरात प्रवेश करुन तिच्या डोक्यात सिलेंडर मारुन तिचे दागिने आणि पैसे लुटून नेल्याची घटना घडली आहे. संबंधित महिलेच्या अंगावर केवळ परकर आणि ब्लाऊज होते, तर त्यांच्या अंगावरील साडी घरापासून काही अंतरावर नांदगाव रस्त्याच्या पलीकडे आढळून आली. 

नांदगाव येथे घडलेल्या या हत्येच्या घटनेची खबर सावर्डे पंचक्रोशीत पसरल्यानंतर गावागावातून अनेक लोक नांदगावमध्ये आले. महिलेची हत्या झाल्याची पाहून सर्वांना धक्का बसला. उपविभागीय पोलीस अधिकारी राजेंद्रकुमार राजमाने यांच्यासह अन्य पोलीस यंत्रणेने तात्काळ घटनास्थळी भेट देऊन या घटनेचा तपास सुरु केला आहे. संबंधित महिलेचे पती पोलीस खात्यातून सेवानिवृत्त झाले असून त्यांचा मुलगा मुंबई येथे पोलीस अधिकारी म्हणून काम करीत आहेत.

Web Title: Sawarde killed a woman in Nandgaon, also stole jewelry