Satara Bus Accident : अपघातग्रस्त गाडी चालवत असल्याचा प्रकाश सावंतदेसार्इंवर आरोप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 2, 2018 04:40 PM2018-08-02T16:40:26+5:302018-08-02T16:49:16+5:30

आंबेनळी दुर्घटनेतून एकमेव बचावलेले प्रकाश सावंतदेसाई हेच अपघातग्रस्त गाडी चालवत असल्याचा संशय मृतांच्या नातेवाईकांना आज व्यक्त केला आहे. यासंदर्भात उच्चस्तरीय चौकशीसाठी मुख्यमंत्री, रायगड जिल्हाधिकारी तसेच कृषी विद्यापीठाच्या कुलगुरुंना निवेदन पाठविण्यात आले आहे.

Satara Bus Accident: Prakash Sawant has been accused of running an automobile | Satara Bus Accident : अपघातग्रस्त गाडी चालवत असल्याचा प्रकाश सावंतदेसार्इंवर आरोप

Satara Bus Accident : अपघातग्रस्त गाडी चालवत असल्याचा प्रकाश सावंतदेसार्इंवर आरोप

ठळक मुद्देअपघातग्रस्त गाडी चालवत असल्याचा प्रकाश सावंतदेसार्इंवर आरोपमृतांच्या नातेवाईकांची चौकशीची मागणी, मुख्यमंत्र्यांना निवेदन

रत्नागिरी : आंबेनळी दुर्घटनेतून एकमेव बचावलेले प्रकाश सावंतदेसाई हेच अपघातग्रस्त गाडी चालवत असल्याचा संशय मृतांच्या नातेवाईकांना आज व्यक्त केला आहे. यासंदर्भात उच्चस्तरीय चौकशीसाठी मुख्यमंत्री, रायगड जिल्हाधिकारी तसेच कृषी विद्यापीठाच्या कुलगुरुंना निवेदन पाठविण्यात आले आहे.

रत्नागिरी जिल्ह्यातील कोकण कृषी विद्यापीठाच्या ३0 कर्मचाऱ्यांचा आंबेनळी घाटात झालेल्या अपघातात मृत्यू झाला होता, या बस दुर्घटनेतील प्रकाश सावंत देसाई एकमेव प्रत्यक्षदर्शी साक्षीदार आहेत. मात्र , सावंतदेसाई यांचे वेगवेगळे वक्तव्य पाहता अपघातामागे संशयास्पद स्थिती असल्याचा आरोप, सामाजिक कार्यकर्ते संजय गुरव यांनी केला आहे.

हे अपघातग्रस्त वाहन सावंत देसाई स्वत:च चालवत असावेत असा आरोप करुन या प्रकरणाची सखोल चौकशी होऊन दोषींना कठोर शासन करावे, अशी लेखी तक्रार मुख्यमंत्री, रायगडचे जिल्हाधिकारी आणि दापोली येथील कोकण कृषी विद्यापीठाच्या कुलगुरुंकडे दिल्याची माहिती सामाजिक कार्यकर्ते संजय गुरव यांनी दिली आहे.

आंबेनळी घाटात झालेल्या अपघातात बस झाडावर आदळल्याच्या खुणा आहेत. कोसळणाऱ्या बसमधून एखादी व्यक्ती बाहेर पडणे कठीण आहे, वेगाने दरीत कोसळणाऱ्या बसमधून क्षणार्धात सावंतदेसाई कसे काय बाहेर पडले, तसेच या ठिकाणी मदतकार्य करणाऱ्या ट्रेकर्सना जिथे दोरखंडाचा व इतर साधनांचा वापर करावा लागला, तिथे सावंतदेसाई कोणताही ओरखडा अंगावर न उठता केवळ हाताच्या सहाय्याने २00 ते २५0 फूट दरीतून वर कसा काय आला, दोन गाड्या सहज पास होतील, एवढा प्रशस्त रस्ता असताना बस दरीच्या कडेला कशी काय गेली, असा सवाल गुरव यांनी केला आहे.

Web Title: Satara Bus Accident: Prakash Sawant has been accused of running an automobile

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.