रत्नागिरीचा सार्थक देसाई महाराष्ट्राच्या क्रिकेट संघात

By अरुण आडिवरेकर | Updated: December 4, 2023 18:39 IST2023-12-04T18:39:23+5:302023-12-04T18:39:48+5:30

रत्नागिरी : बीसीसीआयच्या अंतर्गत होणाऱ्या १६ वर्षांखालील क्रिकेट स्पर्धेसाठी महाराष्ट्र क्रिकेट संघात रत्नागिरीच्या सार्थक देसाई याची निवड करण्यात आली ...

Sarthak Desai in Maharashtra Cricket Team | रत्नागिरीचा सार्थक देसाई महाराष्ट्राच्या क्रिकेट संघात

रत्नागिरीचा सार्थक देसाई महाराष्ट्राच्या क्रिकेट संघात

रत्नागिरी : बीसीसीआयच्या अंतर्गत होणाऱ्या १६ वर्षांखालील क्रिकेट स्पर्धेसाठी महाराष्ट्र क्रिकेट संघात रत्नागिरीच्या सार्थक देसाई याची निवड करण्यात आली आहे. ताे रत्नागिरीतील कै. छोटू देसाई क्रिकेट अकॅडमीचा खेळाडू आहे.

महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनतर्फे घेण्यात आलेल्या आंतर जिल्हा निमंत्रित क्रिकेट स्पर्धेत सार्थकने एक शतक व सुपर लीग स्पर्धेत अशी सलग दोन शतके झळकावली आहेत, तसेच त्याने गोलंदाजी करताना २० विकेटस् घेतल्या आहेत. अष्टपैलू खेळाडू म्हणून त्यांची महाराष्ट्राच्या संघात निवड करण्यात आली आहे. त्याला प्रशिक्षक दीपक देसाई यांचे मार्गदर्शन लाभले आहे.

महाराष्ट्राचा संघ आंध्र प्रदेश येथे दिल्ली संघाविरुद्ध होणाऱ्या सामन्यासाठी रवाना झाला आहे. सार्थक देसाई हा रा. भा. शिर्के प्रशालेचा विद्यार्थी आहे. त्याच्या या निवडीबद्दल महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनचे उपाध्यक्ष व रत्नागिरी जिल्हा क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष किरण सामंत, कार्याध्यक्ष बाळू साळवी, उपाध्यक्ष दीपक मोरे, सचिव बिपिन बंदरकर, सहसचिव बलराम कोतवडेकर, अकॅडमीचे अध्यक्ष गजेंद्र पाथरे, मनोहर गुरव व अमित लांजेकर यांनी त्याचे अभिनंदन केले.

Web Title: Sarthak Desai in Maharashtra Cricket Team