शहरं
Join us  
Trending Stories
1
"लोकसभेच्या ४८ जागांपैकी आम्ही..."; काँग्रेसचा मोठा दावा, विजयी आकडाच सांगितला
2
JP Nadda : "केजरीवालांचा पर्दाफाश, महिलांच्या अपमानावर गप्प का?"; जेपी नड्डा यांचं जोरदार प्रत्युत्तर
3
नरेंद्र मोदींच्या 'रोड शो' साठी मुंबई महापालिकेचा पैसा वापरला; संजय राऊतांचा आरोप
4
बाळासाहेबांच्या खोलीतील कधीही न ऐकलेला गौप्यस्फोट; देवेंद्र फडणवीस म्हणाले...
5
मुंबई इंडियन्स शेवटची मॅचही हरली! हार्दिक पांड्याने सगळे खापर टीमवर फोडले, म्हणतोय...
6
Opening Bell: सेन्सेक्स-निफ्टीच्या कामकाजात तेजी, Nestle च्या शेअर्समध्ये तेजी, JSW घसरला
7
६० नातेवाईक मिळून देवदर्शनाला गेलेले, बसला पहाटे भीषण आग, ८ जणांचा मृत्यू, २४ गंभीर
8
चिमुकल्याचा मृतदेह, रहस्यमय चिठ्ठी अन् 'ते' ७ शब्द; तांत्रिकाच्या मदतीनं अघोरी डाव?
9
किर्गिस्तानमध्ये स्थानिकांचा भारतीय, पाकिस्तानी विद्यार्थ्यांविरोधात हिंसाचार; तीन विद्यार्थ्यांची हत्या
10
Infosys नं वाढवली ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक यांची संपत्ती; पत्नीनंही केली मोठी कमाई, जाणून घ्या
11
तिकडे मोदींची सभा, इकडे ठाकरे गटाचा मिहीर कोटेचांच्या कार्यालयात जोरदार राडा
12
मद्य धोरण प्रकरणात ‘आप’देखील आरोपी; ईडीने दाखल केले नवे आरोपपत्र, इतिहासातील पहिलीच घटना
13
सोढीने केला संसार त्याग?; 25 दिवसानंतर गुरुचरण सिंगची घरवापसी, दिली पहिली प्रतिक्रिया
14
आजचे राशीभविष्य १८ मे २०२४; जुनी येणी, प्रवास, अर्थ प्राप्तीसाठी चांगला दिवस
15
तुमच्या हातात विकसित भारत सोपवूनच जाईन, मुंबईला धक्का लागू देणार नाही: PM नरेंद्र मोदी
16
महागाई, बेरोजगारी, खोटेपणा हीच मोदी यांची गॅरंटी: खरगे, २ कोटी रोजगारांवरुन चढवला हल्लाबोल
17
मी माझा मुलगा तुमच्याकडे सोपवतेय, तो तुम्हाला निराश करणार नाही: सोनिया गांधी
18
अतिरेकी हल्ल्यातील शहिदांचा अपमान करणाऱ्यांना जागा दाखवा: देवेंद्र फडणवीस
19
नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधान होणार, त्यांच्याकडून महाराष्ट्राच्या अपेक्षा: राज ठाकरे 
20
हीच भटकती आत्मा तुम्हाला सत्तेबाहेर बसवेल हे नक्की; शरद पवारांची सडकून टीका

कोकणचा 'समर्थ' युपीएससी परिक्षेत २५५ रँकवर चमकला, पहिल्याच प्रयत्नात मिळवले यश 

By संदीप बांद्रे | Published: April 17, 2024 3:57 PM

लहाणपणीच सनदी अधिकाऱ्याचे स्वप्न पाहणाऱ्या समर्थने प्रचंड मेहनत घेत पहिल्याच प्रयत्नात युपीएससी उत्तीर्ण होण्यात यश मिळवले

चिपळूण : येथील बालपणापासूनच नेतृत्व आणि वकृत्वाचे गुण ठासून भरलेल्या समर्थ अविनाश शिंदे यांनी केद्रीय लोकसेवा आयोग (युपीएससी) परिक्षेत झेंडा फडकवला आहे. युपीएससी परिक्षेत देशपातळीवर २५५ वी रॅक मिळवून तालुक्यातील दसपटी विभागात मानाचा तुरा रोवला. लहाणपणीच सनदी अधिकाऱ्याचे स्वप्न पाहणाऱ्या समर्थने प्रचंड मेहनत घेत पहिल्याच प्रयत्नात युपीएससी उत्तीर्ण होण्यात यश मिळवले. मुळचे कळकवणे व सध्या खेर्डी सती येथे वास्तव्यास असलेले उद्योजक अविनाश शिंदे यांचा समर्थ हा मुलगा. आई नेहा शिंदे या शिक्षीका आहेत. समर्थचे पहिली ते दहावीपर्यंतचे शिक्षण खेर्डी येथील मेरी माता इंग्लिश मिडीयम स्कूलमध्ये झाले. शालेय शिक्षण सुरू असतानाच मुख्याध्यापकांनी सनदी अधिकारी होण्याचे गूण असल्याचे समर्थला सांगितले होते. पुढे बारावीपर्यतचे शिक्षण मॉडर्न कॉलेज पूणे येथे झाले. त्यानंतर रत्नागिरी येथील फिनोलेक्स महाविद्यालयात त्याने मेकॅनिकल इंजिनीरींगचे शिक्षण घेतले. इंजिनीरींगचे शिक्षण झाल्यानंतर स्पर्धा परिक्षेच्या अभ्यासाकरिता पुण्यात गेला आणि केवळ सव्वा वर्षाच्या कालावधीत युपीएससी परिक्षेत यश मिळवण्याचा मान पटकावला. समर्थमध्ये लहाणपणापासून नेतृत्व आणि वकृत्वाचे गुण ठासून भरलेले होते. वडील इंजिनीअर तसेच एमबीए आणि आई प्रख्यात शिक्षीका असल्याने समर्थला लहाणपणापासन चांगले मार्गदर्शन मिळत गेले. त्याने अवांतर वाचनावर भर दिला. पुण्यात बारावीचे शिक्षण घेताना जेईईची केलेली तयारी देखील त्याला फायदेशीर ठरली. युपीएससीचा अभ्यास सुरू असतानाच त्याचे एअरफोर्स मध्ये पहिल्या पाच मध्ये निवड झाली होती. एअरफोर्सची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यास शिकवतानाच त्याने ही कामगिरी केली. परंतू सनदी अधिकाऱ्याचे स्वप्न उराशी बाळगलेल्या समर्थने एअरफोर्समध्ये न जाणे पसंत केले. आयएएससाठी त्यांने परिश्रम सुरूच ठेवले. परिणामी त्याने बाळगलेली जिद्ध, चिकाटी आणि चौकस विचारशैलीमुळे पहिल्याच प्रयत्नात युपीएससी परिक्षत २५५ रॅकने उत्तीर्ण होण्याचा मान पटकावला. 

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीupscकेंद्रीय लोकसेवा आयोग