शहरं
Join us  
Trending Stories
1
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
2
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
3
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
4
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
5
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
6
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
7
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
8
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
9
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
10
थारच्या वाळवंटातून कच्च तेल उत्पादनात विक्रमी वाढ; भारताचे आयातीवरील अवलंबित्व कमी होणार?
11
AI च्या नावाखाली layoff सुरू! Oracle, Amazon, Meta...२०२६ मध्ये हजारो कर्मचाऱ्यांना नारळ
12
मुंबई हादरवण्याचा कट उधळला, २५ सेकंदाच्या व्हिडिओनं पोलखोल; पाकिस्तानी नेटवर्कचा खेळ बिघडला
13
Ashok Kharat Case : भोंदूबाबाचा १ कोटींचा 'महाप्रताप'! अशोक खरातवर १२ वा गुन्हा दाखल; व्यावसायिकाची मोठी फसवणूक
14
शरद पवार-उद्धव ठाकरेंमध्ये चर्चा; बारामती-राहुरी पोटनिवडणुकीबाबत ठरवले? नेमके काय घडतेय?
15
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
16
क्रिकेट सोडून सरकारी नोकरी करायला गेला; चप्पल घालून टाकलेल्या एका चेंडूने 'त्याचे' आयुष्यच बदललं
17
Dhruv Jurel: मास्टरमाइंड जुरेल! आधी दमदार बॅटिंग, मग डोकं लढवून जिंकला सामना, ठरला विजयाचा शिल्पकार
18
अंधश्रद्धेच्या नावाखाली मुलीचा बळी देण्याचा प्रयत्न; स्थानिकांनी वाचवला जीव, आरोपीला बेदम चोप...
19
टाटा ट्रस्टमधील वादाला नवे वळण! TVS च्या वेणू श्रीनिवासन यांचा तडकाफडकी राजीनामा; मेहली मिस्त्रींच्या एका आव्हानाने खळबळ
20
२००० किमी दूर कोलकात्यावर हल्ल्याची धमकी; पाकिस्तानच्या हाती 'अशी' कोणती मिसाइल लागली?
Daily Top 2Weekly Top 5

रत्नागिरी: साई रिसॉर्ट प्रकरण, माजी मंत्री अनिल परबांसह तिघांविरोधात गुन्हा दाखल

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 8, 2022 13:38 IST

रिसॉर्ट पाडण्याच्या हालचालींना वेग आला असतानाच अनिल परबांसह सरपंच, ग्रामसेवकावर गुन्हा दाखल झाल्याने या प्रकरणाने वेगळे वळण घेतले असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.

शिवाजी गोरेदापोली : रत्नागिरी जिल्ह्यातील मुरुड समुद्र किनाऱ्यावरील वादग्रस्त साई रिसॉर्ट प्रकरणी दापोली पोलीस स्टेशनमध्ये माजी मंत्री अनिल परबांसह तिघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यात तत्कालीन सरपंच, ग्रामविकास अधिकारी यांच्यावर फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला आहे. यानंतर एकच खळबळ उडाली. याकारवाई प्रकरणी भाजप नेते किरीट सोमय्या यांनी ट्टिट केले आहे. सोमय्या यांनी केलेल्या ट्टिटमध्ये एफआयआरची कॉपी पोस्ट केली आहे.दापोली पंचायत समितीचे गटविकास अधिकारी रुपा दिघे यांनी फिर्याद दिल्याने अखेर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भारतीय दंड संहिता कलम ४२० अन्वये हा गुन्हा दाखल झाला. रात्री १२ वाजता बीडीओनी तक्रार दाखल केली असता गुन्हा दाखल झाला. याप्रकरणी अनिल परब यांनी खोटी कागदपत्रे, दर करून शासनाचा महसूल बुडवून फसवणूक केल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे.सदर तत्कालीन मालमत्ता धारक अनिल परब यांनी इमारत पूर्ण नसतानाही इमारत पूर्ण असल्याचे भासवून ग्रामपंचायत मुरुड दापोली यांची पर्यायाने शासनाची फसवणूक केलेली आहे, तसेच मुरुड दापोली गावचे तत्कालीन सरपंच, ग्रामसेवक यांनी मुरुड दापोली गट क्रमांक ४४६ मधील इमारत क्रमांक १०७४ ची ग्रामपंचायत नमुना क्रमांक ८ अभिलेख नोंद घेताना समक्ष जागेवर जाऊन इमारतीच्या पूर्णत्वाची खात्री न करता नोंद करून आकारणी केल्याचे दिसून येत असल्याचे गटविकास अधिकारी यांनी दिलेल्या फिर्यादीमध्ये नमूद करण्यात आले आहे.भाजपा नेते किरीट सोमय्या यांनी अनिल परबांचे साई रिसॉर्ट बेकायदेशीर असल्याचे सांगत हे प्रकरणी लावून धरले होते. दुसरीकडे अनिल परबांनी सोमय्यांचे आरोप फेटाळून लावत या रिसॉर्टशी आपला काही संबंध नसल्याचे यापूर्वी स्पष्ट केले होते.दरम्यान, राज्यात सत्तात्तंर होताच सरकारने हे रिसॉर्ट पाडकामाचे आदेश दिले. बांधकाम पाडण्यासाठी निविदाही मागविण्यात आल्या. त्यासाठी लागणारा एक कोटी रुपयांचा निधी शासनाकडून जिल्हाधिकाऱ्यांच्या खात्यामध्ये वर्गही करण्यात आला आहे. त्यामुळे रिसॉर्ट पाडण्याच्या हालचालींना वेग आला असतानाच अनिल परबांसह सरपंच, ग्रामसेवकावर गुन्हा दाखल झाल्याने या प्रकरणाने वेगळे वळण घेतले असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीdapoli-acदापोलीAnil Parabअनिल परबKirit Somaiyaकिरीट सोमय्याCrime Newsगुन्हेगारी