मान्सून महोत्सवात ‘लवकुश’ला प्रतिसाद
By Admin | Updated: June 30, 2015 00:17 IST2015-06-29T23:22:08+5:302015-06-30T00:17:24+5:30
रामायणाचा भास

मान्सून महोत्सवात ‘लवकुश’ला प्रतिसाद
कुडाळ : कुडाळ येथील लाजरी किके्र ट गु्रप आयोजित तिसऱ्या मान्सून महोत्सवाच्या शेवटच्या दिवशी गोवा व सिंधुदुर्गातील कलाकारांनी एकत्र येत सादर केलेल्या संयुक्त दशावतार ‘लवकुश’ या नाटकालाही प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद लाभला. अतिशय सुंदररित्या सादर केलेल्या या नाटकामुळे प्रत्यक्ष रामायणच सुरू आहे की काय, असा भास यावेळी रसिकप्रेक्षकांना होत होता.
कुडाळ येथील लाजरी क्रिकेट ग्रुपच्यावतीने गेली दोन वर्षे मान्सून महोत्सवाचे आयोजन करण्यात येते. दरवर्षीप्रमाणे यंदा या मान्सून महोत्सवात पहिल्या दिवशी ‘सती चंद्रसेना’ व दुसऱ्या आणि शेवटच्या दिवशी ‘लवकुश’ हा संयुक्त दशावतार नाट्यप्रयोग सादर करण्यात आला. एक वेगळेच महत्त्व प्राप्त झालेल्या या मान्सून महोत्सवाला दरवर्षीप्रमाणे यंदाही प्रेक्षकांनी तुडुंब गर्दी केली होती.मान्सून महोत्सवाची संकल्पना मांडून दशावतार कलाकार व कलेला एक वेगळे वैशिष्ट्यपूर्ण व्यासपीठ निर्माण करणारे लाजरी ग्रुपचे राजेश म्हाडेश्वर यांचाही सत्कार करण्यात आला. तुफान गर्दीचा उच्चांक गाठणारा या मान्सून महोत्सवाची सांगता झाली असली, तरी प्रेक्षकांना पुढच्या वर्षी काय, याची उत्सुकता आतापासूनच लागली आहे. प्र्रेक्षकांच्या अपेक्षा मात्र आता लाजरी ग्रुपकडून वाढलेल्या आहेत. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राजा सामंत यांनी केले. (प्रतिनिधी)
रामायणाचा भास
लवकुश या नाटकाला आवश्यक असलेल्या कलाकारांची पात्राप्रमाणे योग्य निवड, सर्व कलाकारांचा उत्कृष्ट अभिनय, उत्कृष्ट रंगभूषा, वेशभूषा व सुंदर संगीतसाथ या सर्वाचा समुच्चय करीत या नाटकाचे सादरीकरण कलाकारांनी केल्याने खरोखरच रामायण सुरू आहे की काय, असा भास प्रेक्षकांना होत होता.
लवकुश जोडी गाजली
लवकुश साकारणाऱ्या दोन्ही कलाकारांनी अपूर्ण असा अभिनय करीत रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजविले. यावेळी हनुमंत&आणि कुश, लवचे आणि लक्ष्मण यांच्यातील युध्दातील चालेले शब्दांचे खेळ आणि वाक्यांच्या उधळणीमुळेही लवकुशाची जोडी या नाटकात खरोखरच गाजली.
नाटकाचे अतिशय सुंदररित्या सादरीकरण सुरू असल्याने या नाटकाशी प्रेक्षकही एकरूप झाले होते. त्यामुळे पुढे काय होणार, याची उत्सुकता ताणली जात होती.
यांनी साकारल्या भूमिका
या नाटकामध्ये गोवा व सिंधुदुर्गमधील पांडुरंग कलिंगण (गणपती), प्रथमेश परब (रिध्दीसिध्दी), आनंद नार्वेकर (राम), उदय कोनसकर (लक्ष्मण), सुधीर तांडेल (सीता), दत्तप्रसाद शेणई (लव), भरत नाईक (कुश), शांती कलिंगण (मारुती), पप्पू नांदोसकर (वाल्मिकी), कृ ष्णा घाटकर (मडवळ), तुकाराम गावडे (मडवळीन), विठ्ठल गावकर (भरत) यांनी भूमिका साकारल्या. या नाटकाला पप्पू गावकर यांनी आपल्या सुमधूर आवाजाने गायन करून उपस्थित रसिक पे्रक्षकांची मने जिंकली.